Sachin vs Akhtar Story : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात तेव्हा काहीतरी वाद हमखास होतोच. मात्र, वैयक्तिक आयुष्यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडूही चांगले मित्र आहेत. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तान माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील अशाच एका मजेदार प्रसंग सांगितला आहे.
या घटनेनंतर अख्तर इतका घाबरला होता की त्याला सचिनच्या पाया पडून माफी मागावी लागली, असे सेहवागने म्हटले आहे. हे तिघे भेटल्यावर या प्रसंगाचा उल्लेख करून खूप हसतो असेही त्यांने सांगितले आहे.
सेहवागने सांगितला किस्सा
सेहवागने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शोएब अख्तरने लखनऊमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटर्ससाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये खूप मद्यपान केले होते आणि सचिनला उचलण्याचा प्रयत्न केला . मात्र, तेंडुलकरला त्याच्यासाठी खूप जड ठरला आणि दोघेही जमिनीवर पडले. हा प्रसंग ऐकून मला हसू आवरता आले नाही.
या घटनेने अख्तरला खूप वाईट वाटलं आणि त्यावर सचिनसारख्या दिग्गज खेळाडूला जखमी केल्यामुळे तुझी कारकीर्द संपली असं सेहवाग त्याला चिडवत राहिला. आता सचिन बीसीसीआयकडे तक्रार करेल या भीतीने शोएब अख्तरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची माफी मागण्याचा निर्णय घेतला.
सेहवाग सांगितले की, यावरून मी शोएबला खूप चिडवायचो. तू आता संघाबाहेर गेलाच, आता तुझी कारकीर्द संपली. तुझ्यामुळे आमच्या अव्वल खेळाडूला पाडलंस आता तुला संघाबाहेर जावं लागेल आणि शोएबला याची जाम भीती वाटत असे. सचिनच्या मागे तो सगळीकडे सॉरी म्हणत फिरत राहिला, इतकेच नाही तर त्याच्या पाया पडला. तरीही मी आणि सचिन आम्ही जेव्हा कधी एकत्र बसतो तेव्हा हा प्रसंग आठवून हसतो असेही सेहवागने सांगितेल.
सेहवागनेही गंमतीने सांगितले की, सचिन इतका वजनदार होता कारण तो भारताच्या आशा खांद्यावर घेऊन चालत होते.सेहवागने याकडेही लक्ष वेधले की भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमधील लढाई ही फक्त मैदानावर चालते. मैदानाबाहेर, जेव्हा जेव्हा एखादा संघ दुसऱ्या संघाला भेट देतो तेव्हा त्यांचे स्वागत खुल्या मनाना आदरातिथ्यने केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.