वर्ल्डकप स्पर्धेत भारताने खेळलेल्या आठही सामन्यात विजय मिळवला आहे. वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत फारशी चमक दाखवू शकलेला नाहीये. पाकिस्तानचे सेमिफायनलमध्ये भारताविरोधात खेळण्याचं स्वप्न खूप धूसर झालं आहे. सेमिफायनलमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तानला चमत्कार करून दाखवावा लागणार आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खिल्ली उडवली आहे.
विरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. "पाकिस्तान जिंदाभाग! घरी परतण्यासाठीचा विमान प्रवास सुरक्षित होवो" असे कॅप्शन देत सेहवागने बाय बाय पाकिस्तान असा मजकूर असलेला फोटो देखील शेअर केला आहे.
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठून पुन्हा एकदा भारताचा सामना करायचा असेल, तर त्याला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. या विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडसमोर ४०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून केलेल्या कामगिरीपेक्षाही मोठा विजय पाकिस्तानला हवा आहे.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर त्याला इंग्लडच्या संघाचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. त्याची फलंदाजी नंतर आली, तर ब्रिटिशांनी दिलेले लक्ष्य अवघ्या अडीच षटकांत गाठावे लागेल.
पाकिस्तानने 300 धावा केल्या तर इंग्लंडला 13 धावात गुंडाळावं लागेल.
जर पाकिस्तानने 400 धावा केल्या तर इंग्लंडला 112 धावात गुंडाळावं लागेल.
जर पाकिस्तानने 450 धावा केल्या तर इंग्लंडला 162 धावात गुंडाळावं लागेल.
जर पाकिस्तानने 500 धावांची विक्रम केला तर इंग्लंडला 211 धावात गुंडाळावं लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.