नवी दिल्ली : भारताचा दिग्गज बुद्धीबळ पटू विश्वानाथन आनंदने नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल विभागाच्या पाचव्या फेरीत पराभव केला. विजयी मार्गावर परतलेल्या विश्वनाथन आनंद स्पर्धेत आता अव्वल स्थानावर पोहचला आहे. आनंदने नॉर्वेचा स्टार कार्लसनला ब्लिट्झ इव्हेंटमध्ये पराभूत केल्यानंतर पुढची लढत ही क्लासिकल सेक्शनमध्ये होती. 40 चालींचा सामना अनिर्णित राहिला होता. (Viswanathan Anand Defeated World No 1 Magnus Carlsen In Norway Chess Tournament)
त्यानंतर आनंदने थरारक अर्मागेडॉनमध्ये (Armageddon) कार्लसनवर रोमांचक विजय मिळवला. अर्मागडॉन 52 वर्षाच्या आनंदने आपली जुनी जादू पुन्हा दाखवत कार्लसनला 50 चालीत पराभवाचा धक्का दिला. आता आनंदच्या खात्यात 10 गुण जमा झाले असून तो आता प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत टॉपवर आहे. या स्पर्धेच्या अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत.
आनंदने क्लासिकल सेक्शनमध्ये सलग तीन विजय मिळवत दमदार सुरूवात केली. त्याने फ्रान्सच्या मॅक्सिमी वचियर लाग्राव्हे, बल्गेरियाच्या व्हेसिलिन टोपालोव आणि चीनच्या हाओ वँगवर विजय मिळवला होता. मात्र चौथ्या फेरीत अमेरिकेच्या विस्लेने त्याचा हा विजयी रथ रोखला होता. नॉर्वेचा सुपरस्टार बुद्धीबळपटू मॅग्नस कार्ल्सन सध्या गुणतालिकेत 9.5 गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.