Pro Kabaddi League 2021, Dabang Delhi vs Puneri Paltan 5th Match : प्रो कबड्डीच्या गत हंगामात उप विजेतेपदावर समाधान मानाव्या लागलेल्या दबंग दिल्लीने (Dabang Delhi ) यंदाच्या हंगामाची सुरुवात दमदार केलीये. पुणे पलटन (Puneri Paltan) विरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्यांनी 41-30 असा धमाकेदार विजय नोंदवला. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून पुण्याचा संघ स्पर्धेत संघर्ष करताना दिसतोय. यंदाच्या हंगामात स्टार रेडर नितीन तोमर (Nitin Tomar) पुण्याच्या संघाचे नेतृत्व करत असून डिफेंडर विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) उप-कर्णधार आहे. या बदलासह पुण्याचा संघ नव्याने सुरुवात करेल, असे वाटले होते. पण सलामीच्या लढतीत त्यांनी पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या...कॅसेट वाजवलं.
पुण्याकडून नितीन तोमरने 7, राहुल चौधरी 5, अस्लम इनामदार 4 अशा सर्वोच्च गुणांची कमाई केली. दुसऱ्या बाजूला दबंग दिल्लीने नवीन कुमारने सुपर 10 सह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 16 गुणांची कमाई केली. पुण्याच्या संपर्ण संघाने मिळवलेल्या गुणांच्या निम्मे गुण त्याने एकट्यानेच मिळवले. विजय मलिकने 9 गुण केले. त्याची सुपर 10 कामगिरी अवघ्या 1 गुणाने हुकली.
पुणेरी पलटनने आपल्या सलामीच्या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. दंबग दिल्लीनं अल्प पिछाडी भरुन काढली. एवढेच नाही तर पुण्याला ऑल आउट करत 5 गुणांची आघाडी घेतली होती. या आघाडीनंतर दिल्लीनं आपली आगेकूच सुरुच ठेवली. बघता बघता त्यांनी स्कोअर बोर्डवर 21-10 आणि 22-15 अशी आघाडी भक्कम केली. दिल्लीच्या संघाला ऑल आउट करत पुण्यानं पुन्हा 3 अल्प गुणासंह आघाडी घेतली. पुण्याच्या तिन्ही रेडर्सला बाकावर बसवत दिल्लीनं पुन्हा सामन्यावरील पकड मजबूत केली. अखेरच्या पाच मिनिटांत दिल्लीने 38-27 अशी आघाडी घेतली होती. त्यांनी एकतर्फी सामना आपल्या बाजूनं ओढला. पुणेरी पलटन 30 पॉइंट्सवर पोहचेपर्यंत दिल्लीनं आपल्या खात्यात 41 गुण जमा केले होते.
प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या हंगामापासून खेळत असलेल्या पुणेरी पलटनला लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. मागील हंगामात संघ दहाव्या स्थानावर राहिला होता. पाचव्या हंगामामध्ये पुण्याच्या संघाने सर्वाच्च कामगिरी केली होती. ते दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास यंदाच्या हंगामात संपेल आणि पुण्याचा दबदबा निर्माण होईल, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.
प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटनची कामगिरी
पहिला हंगाम - आठवा क्रमांक
दुसरा हंगाम - आठवा क्रमांक
तिसरा हंगाम - तिसरा क्रमांक
चौथा हंगाम - चौथा क्रमांक
पाचवा हंगाम - झोन ए मध्ये दुसरा क्रमांक
सहावा हंगाम - झोन ए मध्ये चौथा क्रमांक
सातवा हंगाम - दहावा क्रमांक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.