India In World Cup Final: अंगावर रोमांच आणणारा क्षण! भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचताच ३२ हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम, पाहा व्हिडिओ

भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ३२ हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम, पाहा व्हिडिओ
India In World Cup Final
India In World Cup FinalEsakal
Updated on

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार कामगिरीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. शमीने या सामन्यात न्यूझीलंडसाठी सात विकेट घेत भारताला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेल्या या सामन्यात जवळपास 32,000 हून अधिक क्रिकेट चाहत्यांनी हजेरी लावली. सामन्यादरम्यान राष्ट्रगीत, वंदे मातरम, देशभक्ती गीत गाताना दिसून आले. हा उत्साह अंगावर रोमांच आणणारा होता.

India In World Cup Final
India In World Cup Final : मोहम्मद शामीचा विकेट्सचा 'सत्ता', भारत पोहचला फायनलमध्ये

न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताने स्थान निश्चित केल्याने वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांचा मोठा उत्साह दिसून आला. क्रिकेट रसिकांच्या अभिमानाने आणि उत्साहाने एक अविस्मरणीय देखावा सादर केला. वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष दिसून आला. याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाला हेत आहे. या व्हिडीओमध्ये चाहते देशभक्ती गीत गाताना आणि आंनद व्यक्त करताना दिसत आहेत.

India In World Cup Final
Pakistan Team : शाहीद आफ्रिदीचा जावई झाला पाकिस्तानचा टी-20 कर्णधार, तर या खेळाडूकडे कसोटीत नेतृत्वाची धुरा...

तब्बल १२ वर्षांनंतर भारताने गाठली क्रिकेट वर्ल्ड कपची अंतिम फेरी

चौथ्यांदा, भारताने 1983 आणि 2011 मध्ये ट्रॉफी जिंकून एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. भारत 2003 मध्ये उपविजेता ठरला होता आणि विजेतेपदाच्या लढतीतील प्रतिस्पर्धी कोण असेल आज कळेल, पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.