Washington Sundar : फिनिशर कार्तिकला 'सुंदर' कॉम्पिटिशन; वॉशिंग्टनचे स्ट्राईक रेट पाहून जडेजालाही भरली धडकी?

Washington Sunder Finishes Handsomely With 231 Strike Rate
Washington Sunder Finishes Handsomely With 231 Strike Rate esakal
Updated on

Washington Sundar : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्ट सुंदरने शेवटच्या पाच षटकात दमदार फलंदाजी करत आपल्यातही मॅच फिनिश करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. संजु सॅमसन बाद झाल्यानंतर सुंदर क्रिजवर आला त्यावेळी भारताच्या 46 षटकात 5 बाद 254 धावा झाल्या होत्या. सुंदरने शेवटच्या पाच षटकातील फक्त 16 चेंडू खेळले आणि 37 धावा चोपल्या. त्याने आपल्या या छोटेखानी खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने हेन्री मॅट टाकत असलेल्या 49 व्या षटकात शेवटच्या तीन चेंडूवर दोन चौकार आणि एक षटकार मारले.

विशेष म्हणजे सुंदरचे स्ट्राईक रेट हे 231.25 इतके होते. यामुळे आता स्ट्राईक रेटच्याबाबतीत बाप असलेल्या सूर्यकुमार यादव आणि फिनिशर कार्तिकला देखील सुंदर कॅम्पिटिशन देत आहे. याचबरोबर सुंदरने दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेल्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला देखील धडकी भरवली असेल.

Washington Sunder Finishes Handsomely With 231 Strike Rate
IND vs NZ 1st ODI : लॅथमचे दमदार शतक; पहिल्या वनडे सामन्यात किवींनी केला भारताचा 7 विकेट्स राखून पराभव

भारताची टॉप ऑर्डर चांगल्या सुरूवातीनंतर ढेपाळी. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 94 धावांची दमदार भागीदारी रचत संघाला 254 धावांपर्यंत पोहचवले. मात्र डावच्या शेवटच्या 5 षटकात आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात संजू सॅमसनी 38 चेंडूत 36 धावा करून मिलनेच्या चेंडूवर झेलबाद झाला.

Washington Sunder Finishes Handsomely With 231 Strike Rate
History of FIFA: 'फुटबॉल' हे नाव एका राजाला सुचलं होतं, जाणून घ्या लाडक्या फिफाचा इतिहास

संजू सॅमसन शेवटी 5 षटके उरली असताना बाद झाल्यावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने तुफान फटकेबाजी करत भारताला 300 चा टप्पा पार करून दिला. त्याने मॅट हेन्री टाकत असलेल्या 49 व्या षटकात 2 चौकार आणि 1 षटकार मारत भारताला 300 च्या पार पोहचवले.

दरम्यान शेवटच्या षटकात 76 चेंडूत 80 धावा करणारा अय्यर बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर सुंदरने साऊदीच्या चौथ्या चेंडूवर चौकारला. दरम्यान, डावाच्या शेटवच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाला अन् भारताचा डाव 50 षटकात 7 बाद 306 धावात संपुष्टात आला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.