Wasim Akram : वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने सलग 10 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. मात्र फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला मात देत भारताचं 12 वर्षानंतर वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न तोडलं. या पराभवाची चर्चा अजूनही भारतासोबतच पाकिस्तानातही होत आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने तर भारताच्या पराभवावरून आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये भारताच्या पराभवाची जवळपास रोज चर्चा होत आहे. वसिम अक्रमने अशाच एका चर्चेवेळी भारताच्या पराभवाचे खापर हे चाहते आणि मीडियावर फोडलं.
वसिम अक्रम म्हणाला की, 'तुमच्या संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं होतं. एक देश म्हणून यातून तुम्हाला बाहेर पडणं खूप अवघड जात आहे हे मला माहिती आहे. त्यांनी सलग 10 सामने जिंकले. मात्र तुम्ही काय केलं तर आपल्या संघाला आधीच विश्वविजेता घोषित केलं. मला माफ करा मात्र ही तुमची चूक आहे. ती तुम्हाला स्विकारावीच लागणार आहे. नक्कीच तुम्ही चांगलं खेळला. मात्र एका खराब सामन्यामुळे तुमच्या मेहनतीवर पाणी फिरलं.'
अक्रम पुढे म्हणाला, 'सोशल मीडियावर सुरू झालेल्या गोष्टी गांभिऱ्याने घेऊ नका. इथं अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी टुकार असतात. एक राष्ट्र म्हणून तुम्हाला यातून बाहेर पडावं लागेल. सहा महिन्यात टी 20 वर्ल्डकप आहे त्यासाठी पुन्हा सज्ज व्हा.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.