Wasim Akram Rohit Sharma Toss Controversy : भारत वर्ल्डकप 2023 च्या अंतिम फेरीत पोहचल्यानंतर आपला सख्खा शेजारी पाकिस्तानमधील काही लोकांच्या पोटात जास्तच दुखू लागलं आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी रोहित शर्माच्या नाणेफेकीवेळी नाणे दूर फेकण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत यात काहीतरी काळंबेरं असल्याचं वक्तव्य करत अकलेचे तारे तोडले होते.
मात्र आता या सिकंदर बख्त यांना त्यांच्याच देशातून घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम यांनी बख्त यांना फटकालं असून हे असले लोक कुठून येतात आणि हे सुधरत का नाहीत असे म्हणत त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.
भारताने वानेखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीने दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचे 7 फलंदाज बाद करत भारताला विजय मिळवून दिला.
मात्र न्यूझीलंड जरी हरली असली तर डॅरेल मिचेलने 134 तर केन विलियमसनने 69 धावांची खेळी करत भारताला चांगलची झुंज दिली. त्यांनी केलेल्या 181 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंड 327 धावांपर्यंत मजल मारू शकली.
भारताचा हा सेमी फायनलमधील शानदार विजय पाकिस्तानमधील काही लोकांच्या पचनी पडला नाही. पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त यांनी रोहित शर्माच्या नाणेफेकीवेळी नाणे दूर फेकण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. रोहित मुद्दाम नाणे दूर फेकतो. दुसरा कर्णधार देखील जाऊन पाहात नाही की नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागला आहे.
सिकंदर बख्त यांनी नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागवा यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला. यावर वसिम अक्रमने कडक शब्दात त्यांना फटकारले. अक्रमने हा लज्जास्पद दावा असल्याचे म्हटले.
वसिम अक्रम ए स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'नाणेफेक करताना नाणे कुठं पडणार हे कोण ठरवू शकतं का? मॅट फक्त जाहीरातीसाठी आहे. मला खूप लाज वाटत आहे. मै यावर वक्तव्य देखील करू शकत नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.