Wasim Akram : कपडे, बूट साफ करायला सांगितले, नोकरासारखे वागवले... अक्रमचा खळबळजनक खुलासा

Wasim Akram Servant Controversy
Wasim Akram Servant Controversy esakal
Updated on

Wasim Akram Servant Controversy : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रमकने आपल्या बायोग्राफीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. आता वसिम अक्रमने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलीम मलिकने वसिम अक्रमला एका नोकरासारखे वागवल्याचा आरोप आपल्या बायोग्राफीतून केला आहे. Sultan - A Memoir या आपल्या बायोग्राफीमध्ये त्याने आपल्या जीवनातील अनेक वादग्रस्त प्रकरणांवर प्राकाशझोत टाकला आहे.

Wasim Akram Servant Controversy
सीमावाद क्रिकेटमध्ये पोहचणार, महाराष्ट्र - कर्नाटक अहमदाबादमध्ये भिडणार?

सलीम मलिकने वसिम अक्रमच्या दोन वर्षे आधी पाकिस्तानकडून पदार्पण केले होते. वसिम अक्रमने 1984 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण केले. यामुळे सलीम मलिक हा वसिम अक्रमचा सिनिअर होता. दरम्यान, अक्रमने आपल्या 'सुल्तान ए मेमॉयर' या बायोग्राफीत सलीम मलिकबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहेत. मलिक सिनिअय खेळाडू असल्याचा गैरफायदा उचलत असल्याचे वसिमने सांगितले. मलिक मला नोकरासरखे वागवत होता असा दावा वसिमन केला आहे.

अक्रम म्हणतो की, 'मी ज्यूनियर असल्याचा ते फायदा उठवत होते. तो एक नकारात्मक आणि स्वार्थी माणूस होता. ते मला एक प्रकारे नोकरासारखेच वागवत होते. त्यांनी एकदा मी त्यांची मालिश करावी मागणी केली होती. त्यांनी एकदा मला त्यांचे कपडे आणि बूट देखील साफ करण्याचा आदेश दिला होता. मी त्यावेळी रागात होतो. त्यावेळी रमीझ राजा, ताहिर, मोहसिन, शोएब मोहम्मद सारख्या युवा खेळाडूंनी मला नाईट क्लबमध्ये आमंत्रित केले होते.

Wasim Akram Servant Controversy
Lionel Messi : मेस्सीने मेक्सिकोच्या टीशर्टने फरशी पुसली? VIDEO होतोय व्हायरल

वसिम अक्रम आणि सलीम मलिक हे बराचकाळ पाकिस्तानच्या संघात एकत्र खेळले आहेत. ज्यावेळी ते दोघेही संघाकडून एकत्र खेळायचे त्यावेळी दोघे एकमेकांकडे बघायचे देखील नाही अशी चर्चा केली जात होती. अक्रम मलिकच्या नेतृत्वाखाली देखील खेळला आहे. मलिकने 1992 ते 1995 दरम्यान पाकिस्तानचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने 12 कसोटीतील 7 कसोटी सामने आणि 34 वनडे सामन्यातील 21 सामने जिंकले होते.

त्यानंतर 2000 मध्ये मलिक मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर कायमची बंदी घालण्यात आली होती. मात्र वकार युनूस आणि अक्रम यांच्याविरूद्ध वक्तव्य करणे त्यांनी थांबवले नव्हते. मलिक यांनी अक्रम ज्यावेळी कर्णधार होता त्यावेळी आपल्याशी बोलणे देखील टाळत असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.