IND vs RSA : 'भारतीय टी 20 संघासाठी ऋषभ पंत नाही भरवशाचा'

Wasim Jaffer Statement About Rishabh Pant certainty In India T20I Team
Wasim Jaffer Statement About Rishabh Pant certainty In India T20I Teamesakal
Updated on

नवी दिल्ली : भारताचा माजी कसोटीपटू वसिम जाफरने विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत भारतीय टी 20 संघासाठी खात्रीलायक खेळाडू नाही असे वक्तव्य केले. पंत कसोटीमधील आपली कामगिरी वनडे आणि टी 20 सामन्यात प्रतिबिंबित करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे भारतीय टी 20 संघातील त्याच्या भविष्याबाबत वसिम जाफरला खात्री वाटत नाहये. जारफरने हे वक्तव्य क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत केले. (Wasim Jaffer Statement About Rishabh Pant certainty In India T20I Team)

Wasim Jaffer Statement About Rishabh Pant certainty In India T20I Team
PHOTO : असा झाला भारतीय फुटबॉल संघाचा आशियाई कप 2023 पर्यंतचा प्रवास

ऋषभ पंत सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मायदेशात सुरू असलेल्या टी 20 मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत संघाचा कर्णधार झालेल्या केएल राहुलला दुखापत झाल्याने तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकला. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पंतची कामगिरी देखील म्हणावी तशी झालेली नाही. त्याने 14 सामन्यात 340 धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतील तीन सामन्यात त्याला 34 धावाच करता आल्या.

Wasim Jaffer Statement About Rishabh Pant certainty In India T20I Team
'त्या' 4 - 5 भारतीय खेळाडूंनी मालिका धोक्यात आणली : टीम पेन

जाफर याबाबत म्हणतो की, पंत ज्या प्रकारे स्वतःची विकेट फेकत आहे ते पाहता केएल राहुल संघात परतल्यानंतर त्याला संघातील जागा गमवावी लागू शकते. जाफर म्हणतो, 'तुमच्याकडे केएल राहुल आहे. तो एकदा का परत आला तो थेट संघात येईल. तो एक विकेटकिपर देखील आहे. जर दिनेश कार्तिकला पुढे खेळवण्यात येणार असल्याची खात्री असेल तर तो देखील विकेटकिपिंग करू शकतो. त्यामुळे ज्या पद्धतीने ऋषभ पंत खेळत आहे त्यावरून तो संघात असेल अशी खात्री वाटत नाही.'

वसिम जाफर पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की त्याला सातत्यपूर्ण धावा कराव्या लागतील. त्याने आयपीएलमध्ये असं केलेलं नाही. त्याने टी 20 सामन्यात अजून भरीव कामगिरी केलेली नाही. मी खूपवेळा सांगितले आहे की ज्या प्रकारे तो कसोटी खेळतो, ज्या प्रकारे त्याने काही वनडे सामन्यात खेळी केली आहे. त्या पद्धतीने तो टी 20 सामन्यात खेळताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात भारतीय टी 20 संघात ऋषभ पंत बसेल अशी खात्री देता येत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.