बांगलादेश क्रिकेटचा 'विकास' आता जाफरच्या हाती?

भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या खेळ विकास शाखेचा एक भाग होणार आहे.
बांगलादेश क्रिकेटचा 'विकास' आता जाफरच्या हाती?
esakal
Updated on

भारतासाठी 31 कसोटी सामन्यांमध्ये 34.10 च्या सरासरीने पाच शतकांसह 1944 धावा करणारा माजी भारतीय खेळाडू वसीम जाफर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या खेळ विकास शाखेचा एक भाग होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा भाग बनल्यानंतर तो युवा खेळाडूंच्या खेळात सुधारणा करण्यावर तसेच बोर्डाच्या उच्च कामगिरीवर भर देणार आहे.

बांगलादेश क्रिकेटचा 'विकास' आता जाफरच्या हाती?
रिझवान म्हणतो, भारतीय खेळाडू पाकिस्तानशी खेळण्यास उत्सुक मात्र...

मिळालेल्या माहितीनुसार, वसीम जाफरवर बांगलादेशच्या अंडर १९ मेंस टीमला मजबूत करण्याची जबाबदारी आहे. यादरम्यान, तो बांगलादेशच्या युवा फलंदाजांची खेळी पाहून जिथे जिथे गरज आहे तिथे तो त्यामध्ये सुधारणा करताना दिसणार आहे.

यापूर्वीही वसीम जाफरने २०२९ मध्ये मीरपुर येथे बांगलादेश क्रिकेट बोर्ड अॅकडमीमध्ये फलंदाजी सल्लाकार म्हणून भूमिका पार पाडली आहे. तसेच बांगलादेशाच्या क्रिकेट एज-ग्रुप अंडर-१६ क्रिकेटसोबतही त्यांनी काम केले आहे. यासोबतच मुख्य क्रिकेट टीमचे सल्लाकारच्या रुपात त्यांनी आपली भूमिका पार पडली आहे. बांगलादेशच्या मुख्य क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. जाफर 2018-19 मध्ये अबाहानी लिमिटेडकडून ढाका प्रीमियर लीगमध्येही खेळला होता.

बांगलादेश क्रिकेटचा 'विकास' आता जाफरच्या हाती?
100 कसोटी खेळणारा टीम इंडियातला हा खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?

बांगलादेशच्या मुख्य क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. जाफर 2018-19 मध्ये अबाहानी लिमिटेडकडून ढाका प्रीमियर लीगमध्येही खेळला होता.

जाफरने २०१९ ते २०२१ पर्यंत आयपीएल पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजी कोचची भूमिका पार पाडली आहे. वसीम जाफरला दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटशी जोडल्याचा आणि रणजी ट्रॉफीमध्ये १५६ सामने खेळण्याचा अनुभव आहे. 2008-09 आणि 2018-19 मध्ये दोनदा रणजी हंगामात 1000 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.