New Zealand abandon Pakistan tour : क्रिकेट खेळण्यास आमचा देश सुरक्षित आहे, असा कितीही दावा केला आणि पाहुण्या संघासाठी फुलप्रूफ सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली तरी पाकिस्तान हा देश अजूनही असुरक्षित असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट संघाने दाखवून दिले. पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदर न्यूझीलंड संघाने सुरक्षिततेच्या कारणावरून मालिका रद्द केली. आमच्या सुरक्षा एजन्सीकडून मिळालेल्या संदेशानुसार आम्ही ही मालिका खेळू शकणार नाही, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव दौरा स्थगित केल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि पाकिस्तान सुरक्षा दल संपूर्ण मैदानात शोधमोहीम करताना दिसले. बॉम्बशोधक पथकाला काही हाती लागल्याचे कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मैदानाची कसून तपसाणी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुरक्षा रक्षक आणि बॉम्ब शोधक पथक मैदानाची तपासणी करत असल्याचे दिसत आहेत. पण न्यूझीलंड संघाला धमकी कुणी दिली? याबाबतचे कोणतेही वृत्त समोर आलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला आहे.
बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि पाकिस्तान सुरक्षा दल मैदानावर शोधमोहिम करताना....
2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दशकभराच्या अंतराने पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दरवाजे उघडली गेली. क्रिकेटचे वातावरण आणखी उत्तम करण्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरु असताना त्यांना न्यूझीलंडने मोठा दणका दिला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार होती, परंतु दोन्ही संघांचे खेळाडू हॉटेलमधून स्टेडियमध्ये आलेच नाहीत. न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) 150 ते 200 कोटी नुकसान सहन करावे लागू शकते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक पत्र प्रकाशित करत मालिकेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तान हे चांगले यजमान आहेत, त्यांनी आमच्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था केली केली, परंतु खेळाडूंची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वाधिक प्राधान्य असणारी आहे, सुरक्षिततेच्या याच कारणामुळे मालिकेतून माघार घेणे हाच पर्याय आमच्यासमोर आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मालिका सुरळीत व्हावी यासाठी न्यूझीलंडच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती केली. इम्रान खान यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांना फोन करून सुरक्षेविषयी पूर्ण आश्वासन दिले. यावेळी जगातली सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा आपल्याकडे असल्याचा दावा, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांनी केला. मात्र, इम्रान खान यांच्या या बोलण्याचा न्यूझीलंडवर कोणताही उपयोग झाला नाही. शेवटी न्यूझीलंडने आपला दौरा रद्द करण्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.