Rinku Singh : त्याला फलंदाजी करण्यासाठी येताना पाहिलं अन्... सूर्याला रिंकूमध्ये कोणतं महान व्यक्तीमत्व दिसलं?

Rinku Singh
Rinku Singhesakal
Updated on

Rinku Singh Surya Kumar Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी 20 मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने कांगारूंचा 44 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करत 235 धावा उभारल्या होत्या.

यात यशस्वी जैयस्वाल(53), ऋतुराज गायकवाड(58) आणि इशान किशन (52) यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र रिंकू सिंहने शेवटच्या काही षटकात जी हाणामारी केली त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

रिंकू सिंहने अवघ्या 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 31 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळेच भारताचा मोठा विजय शक्य झाला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव रिंकू सिंहच्या या धडाकेबाज फिनिशिंग स्टाईलवर जाम खूष झाला आहे.

सामन्यानंतर त्याने रिंकूचे तोंडभरून कौतुक केलं. त्यानं रिंकूची अप्रत्यक्षरित्या धोनीशीच तुलना केली.

Rinku Singh
Hardik Pandya : पांड्या याच हंगामात करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व... भारताच्या माजी खेळाडूचं मोठं विधान

सूर्यकुमार म्हणाला, 'हे युवा खेळाडू माझ्यावर जास्त दबाव येऊच देत नाहीत. ते स्वतःच फलंदाजीचा सर्व भार उचलतात. मी त्यांना सांगितलं होतं की इथं प्रथम फलंदाजी करण्यास तयार रहा.'

सूर्या रिंकूच्या जबाबदारीने खेळण्याबद्दल देखील बोलला. तो म्हणाला, 'ज्यावेळी पहिल्या सामन्यात मी रिंकूला फलंदाजी करण्यासाठी येताना पाहिले त्यावेळी त्याची देहबोलीच सर्व काही सांगत होती. त्याने मला कोणाचीतरी आठवण करून दिली. ते नाव सर्वांनाच माहिती आहे.' सूर्यकुमारने धोनीकडे इशारा केला.

Rinku Singh
Shubman Gill : शुभमन गिल होणार गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार; भारतीय संघासाठी देखील अजून एक 'युवा' पर्याय?

दरम्यान, रिंकू सिंहने आपल्या डेथ ओव्हर्समधील हिटिंगबद्दल सांगितले. रिंकू म्हणाला, 'मी या क्रमांकावर खूप फलंदाजी केली आहे. त्यामुळे या क्रमांकावर फलंदाजी करताना कसं शांत रहायचं हे मला माहिती आहे. मला माहिती आहे की कधी मला फलंदाजीसाठी 5 ते 6 षटके मिळतील कधी दोनच षटके मिळतील.'

'मी शेवटच्या 5 षटकात फलंदाजी करत आहे हेच डोक्यात ठेवून सराव केला. लक्ष्मण सरांनी देखील मला नेट्समध्ये सराव करताना हेच सांगितलं होतं.'

रिंकू पुढे म्हणाला, 'मी चेंडू जसा येईल तसा खेळतो. मी हा स्लोअर वन आहे का की वेगाने टाकलेला चेंडू आहे याचा अंदाज घेतो. त्याप्रमाणे मी चेंडू खेळतो.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()