भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्याच्या वर्ल्डकमध्ये केवळ धावाच करत नाही, तर आता त्याने गोलंदाजी मध्ये देखील चमक दाखवून दिली आहे . नेदरलँड्सविरुद्धच्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात त्यान विकेट घेतली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने विराटला गोलंदाजीसाठी बोलावले. कोहलीने नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केले. त्याची विकेट घेताच स्टँड्समध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मा चांगलीच खुष झाल्याचे पाहायला मिळाले.
रोहितने २३ वे षटक टाकण्यासाठी कोहलीला बोलावले. विराटने पहिल्याच षटकात सात धावा दिल्या. यानंतर, त्याने डावाच्या 25व्या आणि त्याच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. कोहलीने एडवर्ड्सला केएल राहुलकडे झेलबाद केले. विराटची विकेट घेताच अनुष्काने आनंद गगनात मावेना, विराटने विकेट घेतल्यानंतरचा तीचा व्हिडीओ समोर आला आहे.
२०१४ नंतर कोहलीला पहिली विकेट
विराट कोहलीने २०१४ नंतर प्रथमच वनडेत विकेट घेतली आहे. गेल्या वेळी त्याने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले होते. त्याला वनडेत पाचवे यश मिळाले आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने प्रथमच विकेट घेतली आहे.
यापूर्वी मॅचमध्ये विराटने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने ५६ चेंडूत ५१ धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद १२८ आणि केएल राहुलने १०२ धावा केल्या. रोहित शर्माने ६१ धावांची तर शुभमन गिलने ५१ धावांची खेळी केली. टीम इंडियाने नेदरलँड्सविरुद्ध ५० षटकांत चार विकेट गमावत ४१० धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.