Australia Squad for WC23 : टीम इंडियाला मिळणार कडवे आव्हान! वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

Australia Squad For WC23
Australia Squad For WC23
Updated on

ऑस्ट्रेलियाने आगामी ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मागील महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक संघात18 खेळाडूंचा समावेश होता, परंतु आता ती संख्या कमी करण्यात आली आहे. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघा यांना या 18 सदस्यांच्या संघातून वगळण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाचे वर्ल्डकप दरम्यान पॅट कमिन्स नेतृत्व करणार असून त्याला वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांची सोबत मिळणार आहे. शॉन अॅबॉट याला राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच संघात अॅश्टन अगर आणि अॅडम झाम्पा हे दोन फिरकी गोलंदाजांचा देखील असणार आहेत

संघ्याच्या फलंदाजीची धुरा डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या आघाडीचे फलंदाजांच्या खाद्यावर आसणार आहे. तर मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन हे ऑलराऊडर म्हणून संघाला बळ देतील.

अॅलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिस हे दोघे संघासाठी यष्टिरक्षक म्हणून काम करतील, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पाहता कॅरीला खेळण्याची संधी मिळू शकते.

Australia Squad For WC23
WC23 Team India Squad : वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा! 'या' खेळाडूचे खेळण्याचे स्वप्न भंगले

सध्या ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. यानंतर ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात जाणार आहेत.

नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यांद्वारे ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांचा खेळ आणि रणनीती सुधारण्याची एक संधी मिळणार आहे. दरम्यान 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियन संघासाठी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. चेन्नई येथे यजमान भारताविरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार आहे.

Australia Squad For WC23
WC23 Team India Squad : सूर्यकुमारपेक्षा भारी आकडेवारी, तरीही संघातून वगळलं, संजू सॅमसनवर अन्याय?

ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक संघ: पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क.

भारतीय संघ कसा असेल?

एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचा फलंदाज म्हणून समावेश केला आहे. लोकेश राहुल आणि इशान किशन यांचा संघात 2 यष्टीरक्षक म्हणून समावेश आहे.

तर रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू असतील. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर असणार आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवाचा संघात समावेश केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.