CWG 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरची रूपेरी कामगिरी

Weightlifter Vikas Thakur Won Silver Medal In 96 kg Weightlifting In Commonwealth Games 2022 Birmingham
Weightlifter Vikas Thakur Won Silver Medal In 96 kg Weightlifting In Commonwealth Games 2022 Birminghamesakal
Updated on

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरूष 96 किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याने एकूण 346 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक पटकावून दिले. वेटलिफ्टिंगमधून भारताला हे तिसरे रौप्य तर एकूण आठवे पदक मिळाले आहे.

96 किलो पुरूष वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या विकास ठाकूरने स्नॅच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात 149 किलो वजन उचलून यशस्वी सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 153 किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात विकास ठाकूरने 155 किलो वजन उचलले. विकास ठाकूरने स्नॅच प्रकारात 155 किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात 187 किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 191 किलोचा भार यशस्विरित्या पेलला. .

मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याला 198 किलो वजन उचलण्यात अपयश आले. विकासने स्नॅचमध्ये 155 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 191 किलो असे एकूण 346 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले. वेटलिफ्टिंग पुरूष 96 किलो वजनीगटात सामोआच्या डॉन ऑपलोजने 381 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर फिजच्या टानियलने कांस्य पदक पटकावले. त्याने 343 किलो वजन उचलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()