Nicholas Pooran : पात्रता फेरीतच गाशा गुंडळावा लागल्यानंतर कर्णधार पूरन म्हणतो...

West Indies Captain Nicholas Pooran Statement
West Indies Captain Nicholas Pooran Statement esakal
Updated on

West Indies Captain Nicholas Pooran WI vs IRE : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीच्या शेवटच्या दिवशी आयर्लंडने वेस्ट इंडीजला मोठा धक्का दिला. आयर्लंडने वेस्ट इंडीजचा 9 गडी राखून पराभव करत सुपर 12 मध्ये दिमाखात प्रवेश केला. याचबरोबर दोन वेळा टी 20 वर्ल्डकप आपल्या नावावर करणाऱ्या वेस्ट इंडीजला पात्रता फेरीतूनच गाशा गुंडळावा लागला. याबाबत वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने प्रतिक्रिया दिली.

West Indies Captain Nicholas Pooran Statement
WI vs IRE : दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विंडीजला आयर्लंडने बसवले घरी

निकोलस पूरन सामना झाल्यानंतर म्हणाला की, 'खूप अवघड आहे. आमच्या फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी केली नाही. फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर फक्त 145 धावा केल्यामुळे गोलंदाजांसाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाला 145 धावात रोखण्याचे मोठे आव्हान होते.'

पूरन पुढे म्हणाला की, 'मी आयर्लंडचे अभिनंदन करतो त्यांनी आज जबदस्त फलंदाजी केली आणि गोलंदाजीत देखील प्रभावी मारा केला. या स्पर्धेतून अनेक सकारात्मक गोष्टी देखील घडल्या. जेनस होल्डर पुन्हा चांगली गोलंदाजी करू लागला आहे. किंगने दमदार फलंदाजी केली. अर्झारी जोसेफने देखील स्पर्धेत प्रभावी मारा केला आहे. हा आम्हाला शिकवणारा अनुभव ठरला. आम्ही आमच्या चाहत्यांची आणि स्वतःची घोर निराशा केली आहे. हा पराभव खूप दुःख देणारा आहे. मी ज्या प्रकारे कामगिरी केली त्यावर मी निराश आहे.'

West Indies Captain Nicholas Pooran Statement
Virender Sehwag : सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नाही तर पाकचा 'हा' फलंदाज करणार सर्वाधिक धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने आयर्लंडसमोर 146 धावांचे आव्हान ठेवले होते. विंडीजकडून किंगने सर्वाधिक 62 धावा केल्या. विंडीजचे विजयासाठीचे 147 धावांचे आव्हान आयर्लंडने 17.3 षटकात 1 फलंदाजाच्या मोबदल्यातच पार करत विंडीजला तब्बल 9 गडी राखून मात दिली. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक 48 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. तर लॉरकेन टकरने 35 चेंडूत 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयर्लंडकडून ग्रेथ डॅनलेने प्रभावी मारा करत 4 षटकात 16 धावा देत 3 फलंदाज टिपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.