West Indies Out Of World Cup: मोठा धक्का! दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर

West Indies Out Of World Cup
West Indies Out Of World Cup
Updated on

West Indies Out Of World Cup 2023 : दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर गेली आहे. झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. विंडीजचा संघ 48 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही.

West Indies Out Of World Cup
Dinesh Karthik : 'मी आता खेळण्यासाठी...' विंडीज दौऱ्यापूर्वी दिनेश कार्तिकने अचानक केली मोठी घोषणा

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 43.5 षटकात केवळ 181 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून फक्त जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांना काही संघर्ष करता आला. होल्डरने 79 चेंडूंत 45 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी शेफर्डने 43 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. (Scotland vs West Indies)

प्रत्युत्तरात स्कॉटलंडने 43.3 षटकांत लक्ष्य गाठले. यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू क्रॉस 74 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी ब्रँडन मॅकमुलेनने 69 धावांची खेळी केली. क्रॉसने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी मॅकमुलनच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक षटकार आला.

West Indies Out Of World Cup
Team India : टीम इंडियाच्या कर्णधारामुळं संपलं भविष्यात सुपरस्टार बनू शकणाऱ्या खेळाडूचं करियर?

याआधी चालू स्पर्धेत वेस्ट इंडिजचाही झिम्बाब्वेकडून पराभव झाला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर विंडीज आधीच खचली होती. वर्ल्डकपच्या मुख्य ड्रॉमधून बाहेर राहण्याची टांगती तलवार त्याच्यावर टांगली गेली होती. विंडीजने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. याआधी विंडीजचा संघ टी-20 विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकला नव्हता.

एकेकाळी वेगवान गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला कॅरेबियन संघ खालील संघाविरुद्ध पराभव होत आहे. याची कारणे अनेक आहेत. मात्र कारण काहीही असो, क्रिकेटचेही एक प्रकारे नुकसान होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.