WI vs IND 2nd Test : विंडीजचा 9 कसोटी मालिकेत भोपळाच! पावसामुळे व्हाईट वॉश हुकला मात्र मालिका भारताच्याच खिशात

West Indies Vs India 2nd Test
West Indies Vs India 2nd Testesakal
Updated on

West Indies Vs India 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी तुफान पाऊस पडल्याने अनिर्णित राहिला. या कसोटीच्या सामनावीराचा पुरस्कार हा दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला देण्यात आला. विशेष म्हणजे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील गेल्या 9 कसोटी मालिकेत विंडीजला एकही कसोटी मालिका जिंकता आलेला नाही. (Rohit Sharma)

भारताने दोन कसोटी सामन्यातील पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता. मात्र सामना अनिर्णित राहिल्याने भारताला विंडीजला 2 - 0 असा व्हाईट वॉश देता आला नाही. असे असले तरी भारताने मालिका 1 - 0 ने खिशात टाकली.

West Indies Vs India 2nd Test
Chennai Super Kings Captain : राज तिलक की करो तैयारी... अंबाती रायुडूनं ऋतुराजबाबत केलं मोठ वक्तव्य

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडीज आपला दुसरा डाव 2 बाद 76 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करणार होता. भारताला सामना जिंकण्यासाठी आठ विकेट्सची गरज होती तर विंडीजला विजयासाठी 289 धावा करण्याची गरज होती. मात्र पावसामुळे पाचव्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. अखेर दुसरा सामना अनिर्णित राहिला अन् भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 0 ने जिंकली.

West Indies Vs India 2nd Test
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचं नाव गोवा रणजी संघात नाही; 28 खेळाडूंची यादी जाहीर मात्र...

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 438 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 255 धावात संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला.

भारताने ठेवलेल्या 364 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने चौथ्या दिवसअखेर 2 बाद 76 धावा केल्या होत्या. मात्र पाचवा दिवस पाण्यात गेला. दुसऱ्या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने 121 रोहित शर्माने 80 तर यशस्वी जैसवालने 57 धावा केल्या. अश्विनने 56 तर रविंद्र जेडजाने 61 धावा केल्या. दुसऱ्या डावात रोहितने 57 तर इशान किशनने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने 5 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.