West Indies vs India 3rd ODI : भारताने वेस्ट इंडीजला तिसऱ्या सामन्यात 151 धावात गाशा गुंडळायला लावत सामना तब्बल 200 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या होत्या.
त्याच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ 151 धावात गारद झाला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. या दोघांना कुलदीप यादवने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. विंडीजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक 39 धावा केल्या.
तत्पर्वी, भारताने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात अखेर आपल्या बॅटिंगचा दम दाखवलाच! नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या विंडीजचा निर्णय हार्दिकच्या नेतृत्वातील भारतीय संघाने चुकीचा ठरवला. भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या.
भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 85 तर इशान किशनने 77 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 51 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. हार्दिक पांड्याने देखील अर्धशतक (70) ठोकत भारताला 300 पार धावसंख्या उभारून दिली. विंडीजकडून रोमारियो शेफर्डने 2 विकेट्स घेतल्या.
भारताच्या 352 धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरूवात अत्यंत खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने ब्रँडन किंगला शुन्यावर, कायल मेयर्स 4 तर शे होपला 5 धावांवर बाद करत विंडजची अवस्था 3 बाद 17 अशी केली.
सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचल्यानंतर 35 धावा कर साथ सोडली. त्यानंतर हार्दिकने रविंद्र जडेजासोबत भारताला 50 षटकात 5 बाद 3 धावांपर्यंत पोहचवले. हार्दिकने नाबाद 70 धावांची खेळी केली.
संजू सॅमसन अर्धशतक करून तर शुभमन गिल 85 धावा करून बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताला 300 च्या पार पोहचवले.
इशान किशन 77 धावा करून बाद झाल्यानंतर आलेला ऋतुराज गायकवाड अवघ्या 8 धावांचे योगदान देऊम माघारी परतला. यानंतर आलेल्या संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावगती वाढवण्यास सुरूवात केली.
वेस्ट इंडीजचा लेग स्पिनर करिआने अखेर भारताची सलामी जोडी फोडली. शुभमन गिलसोबत 143 धावांची दमदार सलामी दिल्यानंतर इशान किशन 77 धावा करून बाद झाला.
इशान किशनने या मालिकेतील आपले सलग तिसरे अर्धशतक ठोकले. त्याने शुभमन गिल सोबत नाबाद शतकी सलामी दिली.
इशान किशन आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यात देखील दमदार भागीदारी रचली. त्यांनी 8 षटकात नाबाद 51 धावा केल्या. इशान किशन आक्रमक खेळत होता तर त्याला गिलने बॉल टू रन धावा करत चांगली साथ दिली.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विंडीजचा कर्णधार शे होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघात दोन बदल केले आहेत. ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट यांचा संघात समावेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.