India Vs West Indies 3rd T20I : भारताने वेस्ट इंडीजचे 160 धावांचे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. मोक्याच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला तिलक वर्माने 49 धावांची नाबाद खेळी करत चांगली साथ दिली.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले. वेस्ट इंडीजकडून सलामीवीर ब्रँडन किंगने 42 तर कर्णधार रोव्हमन पॉवेलने फटकेबाजी करत विंडीजला 150 पार पोहचवले. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 4 षटकात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 40 धावा करत वेस्ट इंडीजला 5 बाद 159 धावांपर्यंत पोहचवले.
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्माने धावांची गती वाढवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
सूर्यकुमार यादवने आपला धडाका 10 व्या षटकानंतरही कायम ठेवला. त्याने 44 चेंडूत 83 धावा ठोकल्या. मात्र अल्झारी जोसेफने त्याला बाद केले. सूर्या बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी 39 धावांची गरज होती.
भारताचा दुसरा सलामीवीर शुभमन गिल 6 धावांची भर घालून माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारताच्या डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 23 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्मासोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 63 धावांची भागीदारी रचत संघाला 10 षटकात 97 धावांपर्यंत पोहचवले.
टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालचे पदार्पण अयशस्वी ठरले. तो अवघी 1 धाव करून बाद झाला.
निकोलस पूरनला 20 धावांवर बाद केल्यानंतर कुलदीपने सेट झालेल्या किंगला 42 धावांवर बाद करत विंडीजला चौथा धक्का दिला.
वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने आजच्या सामन्यात देखील आपली झलक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने सलामीवीर ब्रँडन किंगच्या साथीने विंडीजला 14 व्या षटकात शतक पार करून दिले. मात्र 12 चेंडूत 20 धावा करणाऱ्या कुलदीपने त्याला स्टम्पिंग करत विंडीजला तिसरा धक्का दिला.
ब्रँडन चेस आणि कायल मेयर्स यांनी विंडीजसाठी 55 धावांची अर्धशतकी सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताने त्यांना दोन धक्के दिले. अक्षरने मेयर्सला 25 धावांवर तर कुलदीप यादवने जॉन्सन चार्ल्सला 12 धावांवर बाद केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने पहिल्या 5 षटकात बिनबाद 32 धावा करत सावध सुरूवात केली.
पहिल्या दोन सामन्यात पराभव पदरी पडल्यानंतर हार्दिक पांड्याने तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर इशान किशनच्या ऐवजी यशस्वी जैसवालला संधी देण्यात आली आहे. तर रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादव संघात परतला आहे.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.