Suryakumar Vs Sanju Samson : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून जिंकला. या विजयानंतर भारताने मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. मात्र या सामन्यात भारताची मधल्या फळीचा कुचकामीपणा ठळकपणे दिसून आला. (Suryakumar Yadav ODI Performance)
ज्यावेळी रोहितने पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग 11 ची घोषणा केली. त्यावेळी संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवल्याने तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता. रोहित शर्माने विकेटकिपर म्हणून इशान किशनला पहिली पसंती दिली. त्याची डावखुरी फलंदाजी देखील संघाच्या कॉम्बिनेशनसाठी चांगली असल्याने त्याचा त्याला फायदा झाला.
मात्र गुणवत्तेच्या बाबतीत एका वेगळ्याच स्तरावर असलेल्या संजू सॅमसनला मात्र सातत्याने डावलले जात आहे. जर संजूला वनडे संघात स्थान द्यायचं असेल तर तो फलंदाज म्हणून मधल्या फळीत सेट होते. म्हणूनच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यात तुलना केली जात आहे. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मात्र त्याच्या कामगिरी सातत्य दिसत नाहीये.
सूर्यकुमार यादव वनडेमध्ये फारशी चमक दाखवू शकलेला नाही. सूर्यकुमार यादव गेल्या तीन वनडे सामन्यात भोपळाही फोडू शकला नव्हता. विंडीजविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 19 धावा केल्या. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. सूर्याच्या शेवटच्या सहा वनडे इनिंग देखील फार उत्साहवर्धक नाही. त्याने गेल्या सहा वनडे सामन्यात 19, 0, 0, 0, 14, 31 धावा केल्या आहेत.
याच तुलनेत सॅमसनची आकडेवारी पाहिली तर गेल्या सहा इनिंगमध्ये संजूने 36, नाबाद 2, नाबाद 30, नाबाद 86, 15 आणि नाबाद 43 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार आणि संजू सॅमसन यांच्या सरासरीची तुलना केली तर सॅमसनने 11 सामन्यात 66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर सूर्यांने गेल्या 24 सामन्यात 23.78 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. (Sanju Samson Stats Of ODI)
रोहित शर्मा पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीवेळी म्हणाला होता की, 'संघ म्हणून कुठे आहोत हे चाचपण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत. आम्ही एक स्पष्ट मानसिकतेने वर्ल्डकपला सामोरे जाणार आहोत. आमच्या दृष्टीने सामन्याचा निकाल देखील महत्वाचा असणार आहे.'
'सध्याच्या घडीला आम्ही वेगवेगळे खेळाडू चाचपणार आहोत. मात्र आम्ही सामन्याच्या निकालाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जगातील प्रत्येक खेळाडू जो सर्व क्रिकेट फॉरमॅट खेळतोय त्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागेल. आशा आहे की आम्हाला जे हवं आहे ते आम्ही मिळवू.' रोहितच्या या वक्तव्यामुळे तो वनडे वर्ल्डकपपूर्वी अनेक गोष्टींबाबत प्रयोग करण्याची शक्यता आहे.
सूर्याची टी 20 फॉरमॅटमधील कामगिरी दमदार आहे त्यात काही शंका नाही. मात्र त्याची वनडेमधील कामगिरी म्हणावी तशी होत नाहीये. मात्र निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाचा त्याच्या कौशल्यावर विश्वास आहे. त्याला या विश्वासावर आणि अपेक्षेवर खरे उतरावे लागणार आहे. कारण वर्ल्डकपसाठी अवघे दोन महिने राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.