आयपीएलच्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) ज्या कॅरेबियन खेळाडूवर मोठा डाव खेळला तो फायदाचा ठरणार याचे संकेत मिळत आहेत. टीम इंडिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करत निकोस पूरन याने याची पहिली झलक दाखवून दिली होती. त्यानंतर आता त्याने T10 लीगमध्ये धमाकेदार खेळीची नोंद केलीये. त्याने टी-10 लीगमध्ये शतकी धमाका करुन दाखवला. सर्वाधिक जलद शतकी खेळी करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. (West Indies wicketkeeper Nicholas Pooran smashes 37 ball century in Trinidad T10 Blast Watch Video)
निकोलस पूरन याने त्रिनिदाद टी10 ब्लास्ट स्पर्धेत 37 चेंडूत शतक साजरे केले. टी10 लीगमध्ये फार शतके पाहायला मिळत नाहीत. पण पूरनने यात आपल्या नावाचा समावेश केला आहे. याआधी स्कॉट एडवर्ड्सने युरोपियन क्रिकेट लीगमध्ये 32 चेंडूत शतक झळकावले होते. लॅदरबँक जाएंट्स (LEATHERBACK GIANTS) कडून मैदानात उतरलेल्या डावखुऱ्या पूरनने SCARLET IBIS SCORCHERS विरुद्धच्या सामन्यात 37 चेंडूत 6 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली. या तुफान फटकेबाजीच्या जोरावर त्याच्या संघाने 9 विकेट्सनं विजय नोंदवला. लॅदरबँक जाएंट्सने 129 धावांचे लक्ष्य 8.3 षटकाच पार केले. यात निकोलस पूरनने एकट्याने 101 धावा कुटल्या.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामासाठी संघ बाधणीसाठीची 2 दिवसीय मेगा ऑक्शन प्रक्रिया नुकतीच पार पडली. बंगळुरुमध्ये झालेल्या IPL Mega Auction मध्ये वेस्ट इंडीज (West Indies) चा विकेट कीपर आणि फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याला संघात घेण्यासाठी कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) चा मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि हैदराबाद संघाची (Sunrisers Hyderabad) सह मालकीण काव्या मारन (Kavya Maran) यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली होती. काव्या मारन यांनी ही बाजी जिंकली होती. निकोलस पूरनसाठी त्यांनी मूळ किंमतीच्या दहा पट रक्कम मोजली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.