WFI Elections : बृजभूषण पिता-पुत्र अखेर कुस्ती महासंघाच्या निवडणुकीतून बाहेर

कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यासाठी आज मतदान करणाऱ्या राज्यांच्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली.
BJP MP Brij Bhushan Singh
BJP MP Brij Bhushan SinghSakal
Updated on

नवी दिल्ली : बहुचर्चित बृजभूषण शरण सिंग आणि त्यांचा मुलगा करण हे भारतीय कुस्ती महासंघाच्या आगामी निवडणुकीच्या मैदानात नसणार, हे निश्चित झाले आहे. पण त्यांचा जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

कुस्ती महासंघाची निवडणूक १२ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यासाठी आज मतदान करणाऱ्या राज्यांच्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली; मात्र ज्या व्यक्ती त्या त्या राज्यांशी संबंधित नाहीत, त्यांची नावे त्या त्या राज्यांचे प्रतिनिधी म्हणून कळवण्यात आली आहे.

BJP MP Brij Bhushan Singh
India Wrestling Squad Asian Games: आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची निवड

कुस्ती महासंघाच्या घटनेनुसार राज्य संघटनेच्या कार्यकारी समितीतीलच व्यक्ती त्या राज्यातून निवडणूक प्रक्रियेचा भाग असू शकतो किंवा उमेदवार असू शकतो; पण घटनेतील या नियमाला या वेळी बगल देण्यात आली आहे.

बृजभूषण सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातील साक्षीदार अनिता शोरान ओडिशाची प्रतिनिधी असणार आहेत.

३८ वर्षीय अनिकाने २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेक पदक मिळवलेले आहे. ती मूळची हरियाणातील असून तेथे पोलिस दलात नोकरी करते. त्याचप्रमाणे प्रेम चंद लोचाब गुजरात राज्याचे प्रतिनिधी असणार आहे. आश्चर्य म्हणजे प्रेच चंद रेल्वे क्रीडा बोर्डाचे सचिव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.