IPL 2021 कोरोना विषाणूच्या (Covid 19 ) वाढत्या प्रादुर्भात सुरु असलेल्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेला अखेर ब्रेक लागला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR )आणि चेन्नई सुपर किंग्जसह (CSK) सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बीसीसीआयला (BCCI) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुन्हा खेळवण्याचा प्रयत्न बीसीसीआय करणार आहे. पण जर ही स्पर्धा रद्द झाली तर खेळाडूंच्या (IPL Playres Salaries ) पैशाचे काय? हा एक प्रश्नच आहे. जर स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली तरी खेळाडूंना याचा आर्थिक फटका बसणार नाही. खेळाडूंना ठरल्याप्रमाणेच पैसे दिले जातील.
...म्हणून खेळाडूंना आर्थिक फटका बसणार नाही
आयपीएलच्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात सॅलरी दिली जाते. अनेक खेळाडू या स्पर्धेत कोट्यवधी रुपये कमावतात. युवा आणि अकॅप्ड प्लेयर्स या स्पर्धेच्या माध्यमातून रातोरात श्रीमंत झाल्याचे किस्सेही तुम्ही ऐकले असतील. सध्याच्या घडीला स्पर्धा स्थगित झाल्यामुळे खेळाडूंना मिळणारे मानधन देणे आयोजकांना परवडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण बीसीसीआयने स्पर्धा स्थगित झाल्यानंतर 2200 कोटींचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. बीसीसीआयला नुकसान सोसावे लागले तर स्पर्धेतील खेळाडूला याचा फटका बसणार नाही. याचे कारण खेळाडूंची सॅलरी ही फ्रेंचायझीच्या इन्शुरन्स प्लानचा हिस्सा आहे. स्पर्धेदरम्यान खेळाडूला दुखापत झाली किंवा अन्य कारणामुळे तो खेळू शकला नाही तर त्याला संपूर्ण सॅलरी मिळू शकते.
कशी दिली जाते सॅलरी
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, यंदाच्या हंगामात सॅलरीच्या रुपात खेळाडूंना 483 रुपये दिले जाणार होते. ही सॅलरी त्यांना तीन टप्प्यात दिली जाते. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही हिस्सा खेळाडूंना दिला जातो. तो हिस्सा यापूर्वीच दिला आहे. उर्वरित सॅलरीचा हिस्सा हा स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. स्पर्धा स्थगित झाल्यामुळे याची गणिते बिघडली असली तरी इन्सुरन्समुळे स्पर्धा रद्द झाली तरी खेळाडूंना ती रक्कम मिळू शकते.
what about playres salaries after IPL 2021 tournament cancel
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.