India Vs Zimbabwe T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 च्या गट 2 मधून भारताने बुधवारी बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत जाण्यासाठी मोठी झेप घेतली. त्यांचे स्थान अद्यापही निश्चित झालेले नाही. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका अजूनही या शर्यतीत आहेत. पाकिस्तानने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला, तर रोहित शर्माचा संघ त्यांच्या गटात अव्वल स्थानावर जाईल. पण सामना पावसामुळे झाला नाही तर?
टी-20 विश्वचषक मध्ये सर्वात मोठा धोका पाऊस राहिला आहे, ज्याने अनेक सामने खराब केले आहेत. गट-2 च्या सामन्यामध्ये पाऊस जरा कमी झाला पण गट-1 मधील काही महत्त्वाचे सामने पावसामुळे झाला नाही. त्यामुळे मोठ्या संघांना उपांत्य फेरीच्या पात्रतेच्या दृष्टिकोनातून गुण वाटून नुकसान सहन करावे लागले आहे.
टीम इडिया सध्या 6 गुणांसह आपल्या गटात प्रथम क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका (5 गुण) दुसऱ्या क्रमांकावर आणि पाकिस्तान (4 गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात जर पाऊस आला तर आणि 5 षटकांचा सामना देखील खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना गुण दिल्या जाईल. अशा स्थितीत भारताकडे आणखी एका गुणासह 7 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र होईल.
जरी भारत आणि झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे रद्द झाला तरी त्याचा फायदा काही केल्या भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला होणार नाही. त्यांनी जर बांगलादेशला मात दिली तरी त्यांना 2 गुणांपेक्षा जास्त गुण मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत भारत दक्षिण आफ्रिकेसोबत सेमी फायनलसाठी पात्र होईल. त्यामुळे भारत-झिम्बाब्वे सामन्यात वरूणराजाची आराधना करून पाकिस्तानला काही फायदा होणार नाही.
मात्र जर दक्षिण आफ्रिका नेदरलँडविरूद्ध हरला आणि पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केलं तरच पाकिस्तान भारतासोबत सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो. मात्र नेदरलँडविरूद्ध दक्षिण आफ्रिका हरण्याची शक्यता फार कमी आहे. जर या सामन्यात पावसाचा खेळ झाला आणि आफ्रिका नेदरलँडला प्रत्येकी 1 गुणावर समाधान मानावे लागले तरी पाकिस्तान आणि आफ्रिका यांच्यातील अव्वल धावगती असलेला संघ सेमी फायनल गाठेल. सध्या दक्षिण आफ्रिकेची धावगती सरस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.