IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? जाणून घ्या संपूर्ण गणित

Ind Vs Pak Asia Cup 2022
Ind Vs Pak Asia Cup 2022
Updated on

IND vs PAK Asia Cup 2023 Weather Report : आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. मात्र शनिवारी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पावसाचा मोठा धोका आहे.

श्रीलंकेच्या दक्षिण भागात पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारच्या हवामान अहवालानुसार पावसाची 70 टक्के शक्यता आहे, त्यामुळे सामना होण्याची शक्यता कमी आहे.

Ind Vs Pak Asia Cup 2022
Asia Cup 2023: इशान किशनसाठी कोण देणार बलिदान? रोहित धर्म संकटात, गिल अन् कोहलीच्या जागी टांगती तलवार

भारताचे पुढील दोन सामने, पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध शनिवार आणि सोमवारी कॅंडी येथे होणार आहेत. हवामान खात्याच्या मते, कॅंडीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान पावसाची शक्यता सध्या 70 टक्के आहे. दुपारी 2:30 वाजता (सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी) पाऊस पडणे अपेक्षित आहे, ज्यामुळे नाणेफेक आणि अखेरीस सामना उशीर होऊ शकतो आणि जर पाऊस सुरू राहिला तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

Ind Vs Pak Asia Cup 2022
Ind vs Pak : 'जास्त भावूक होऊ शकत नाही कारण...' पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी उपकर्णधार काय म्हणाला?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाला तर?

ही स्पर्धा 50 षटकांची आहे, ग्राउंड स्टाफला सामना पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास, संघाना 20 षटकांच्या लढतीसाठी हवे लागेल. पण तरीही हे शक्य झाले नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये गुणांची विभागणी होईल.

पाकिस्तान आपोआप सुपर 4 टप्प्यात प्रवेश करेल, कारण त्यांनी अ गटातील इतर संघ नेपाळला आधीच पराभूत केले आहे. भारताला पुढच्या फेरीत जाण्यासाठी नेपाळला त्यांच्या गट सामन्यात पराभूत करावे लागेल.

शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान अ गटातील सामन्याच्या अगोदर श्रीलंका आशिया कप मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध करणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पाऊस आणि ओल्या आउटफिल्डमुळे तो सामना थोडा लेट चालू होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामानामुळे मैदानातील कर्मचाऱ्यांना मैदान तयार करणे कठीण झाले आहे. तथापि, चांगली बातमी अशी आहे की, आता तरी सूर्यदेवाचे दर्शन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.