Asia Cup 2023 Opening Ceremony : आशिया कप 2023 ची सुरूवात 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिला सामना हा यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी मुल्तानमध्येच आशिया कपचा उद्घाटन सोहळा देखील होणार आहे. गेल्या वर्षी आशिया कपवर श्रीलंकेने कब्जा केला होता.
आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जातो. मात्र यंदा वनडे वर्ल्डकप तोंडावर असल्याने सराव व्हावा म्हणून आशिया कपही वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
आशिया कपकडे वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणूनही पाहिलं जात आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात होणार असल्याने आशिया खंडातील संघांचे या वर्ल्डकपवर वर्चस्व असणार आहे.
यापूर्वीच प्रत्येक संघाला एकमेकांची ताकद आजमावून पाहण्याची आशिया कपमध्ये संधी मिळाली आहे. आशिया कपची फायनल 17 सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे.
आशिया कप उद्घाटन सोहळा कधी होणार आहे?
आशिया कप 2023 चा उद्घाटन सोहळा हा बुधवारी 30 ऑगस्टला होणार आहे.
आशिया कपचा उद्घाटन सोहळा कोठे होणार आहे?
आशिया कप 2023 चा उद्घाटन सोहळा हा पाकिस्तानातील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याची वेळ किती आहे?
पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्यापूर्वी होणार आहे. सामन्याची सुरूवात ही दुपारी 3 वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनलवर या उद्घाटन सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण?
आशिया कप आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोट्सवरून होणार आहे.
आशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमिंग कोणत्या अॅप, वेबसाईटवरून होणार?
आशिया कपच्या उद्घाटन सोहळ्याचे आणि सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे डिज्ने हॉटस्टारवरून होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.