धोनीच्या सिलेक्शनसाठी मोरेंनी गांगुलीशी घेतला होता पंगा

भारतीय टीमला आक्रमक फलंदाज आणि विकेट किपरची गरज होती. जो फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल आणि द्रविडच्या खांद्यावरील विकेट किपरची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूचा शोध धोनीवर येऊन संपला.
MS Dhoni
MS DhoniFile Photo
Updated on
Summary

भारतीय टीमला आक्रमक फलंदाज आणि विकेट किपरची गरज होती. जो फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल आणि द्रविडच्या खांद्यावरील विकेट किपरची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूचा शोध धोनीवर येऊन संपला,

भारतीय संघाचे माजी विकेट किपर फलंदाज किरण मोरे (Kiran More) यांनी एमएस धोनीच्या सिलेक्शनची कहाणी सांगितलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत होता. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुनही धोनीला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख किरण मोरे यांनी धोनीला संघात संधी मिळवून देण्यासाठी धडपड केली. धोनीला संघात घेण्यासाठी 10 दिवस भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीला समजावत होतो, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे. (When Kiran More Persuaded Ganguly to Give Young MS Dhoni a Shot)

भारतीय टीमला आक्रमक फलंदाज आणि विकेट किपरची गरज होती. जो फलंदाज आक्रमक फलंदाजी करेल आणि द्रविडच्या खांद्यावरील विकेट किपरची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूचा शोध धोनीवर येऊन संपला, असे मोरे म्हणाले. 2001 मध्ये दीप दासगुप्ता, अजय रात्रा (2002 ), पार्थिव पटेल ( 2003) आणि दिनेश कार्तिक (2004 ) यांनी विकेट किपर म्हणून भारतीय संघात जागा मिळवली. पण ते आपले स्थान पक्के करण्यात अपयशी ठरले. वनडेमध्ये विकेटमागची जबाबदारी ही द्रविडकडे होती. 2003 चा वर्ल्ड कप द्रविडने विकेट किपर फलंदाज म्हणूनच खेळला.

MS Dhoni
टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ; ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय

किरण मोरे पुढे म्हणाले की, " भारतीय संघासाठी 6-7 क्रमांकावर येऊन आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची गरज होती. त्यावेळी द्रविडने 75 सामन्यात विकेट किपिंग केली होती. विकेट किपर आणि फंलदाजाचा शोध सुरु असताना धोनीच्या रुपात आम्हाला हवा असणारा खेळाडू मिळाला. दिलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये धोनीने धमाकेदाक खेळी केली. 2004 मध्ये नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात हा सामना रंगला होता. ईस्ट झोनकडून दीपदास गुप्ता नियमित विकेटकीपर होता. माझ्या सहकाऱ्याने धोनीची बॅटिंग पाहिली होती. त्याने 170 चेंडूत 130 धावा केल्या होत्या. फायनलमध्ये धोनी विकेट किपर म्हणून खेळावा, असे आम्हाला वाटत होते. या मुद्यावरुन गांगुली आणि दीप दासगुप्ता याच्यांशी चांगलाच वादही झाला होता, असा दावा किरण मोरे यांनी एका मुलाखतीमध्ये केलाय. दीपदास गुप्ता ऐवजी धोनीकडून विकेटकीपिंग करुन घ्यावी, हे समजून देण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला. या फायनल धोनीने ओपनिंग केली होती. पहिल्या डावात 21 तर दुसऱ्या डावात त्याने 47 चेंडूत 60 धावांची खेळी केली होती.

MS Dhoni
T-20 वर्ल्डकपसंदर्भात ICCने BCCIची मर्जी राखली

किरण मोरे म्हणाले, धोनीने नॉर्थ झोनच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध चांगली फटकेबाजी केली होती. यात आशिष नेहराचाही समावेश होता. या सामन्यानंतर धोनीला इंडिया ए संघात स्थान देण्यात आले. त्याला केनिया दौऱ्यावर संधीही मिळाली. तिरंगी मालिकेत धोनीने 600 धावा केल्या आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही, असे किरण मोरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.