R Praggnanandhaa Vs Magnus Carlsen : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रग्नानंद हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसेन यांच्यात चेस वर्ल्डकपचा सामना होणार आहे. हा सामना आज (दि. 22) अझरबैजानमधील बाकू येथे होणार आहे. अवघ्या 18 वर्षाच्या प्रग्नानंदने सेमी फायनलमध्ये जागितक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबिआनो कारूआनानाचा पराभव केला होता.
या विजयाबरोबरच प्रग्नानंद हा बुद्धीबळाच्या विश्वचषकात अंतिम सामन्यात खेळणारा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसराच भारतीय ठरला आहे. हा प्रग्नानंद आणि आणि कार्लसेन यांच्यातील 20 वा सामना आहे. यात प्रग्नानंद 7 - 6 असा आघाडीवर आहे.
प्रग्नानंद आणि कार्लसेन यांच्यातील अंतिम सामना कधी होणार?
आर. प्रग्नानंद विरूद्ध मॅगन्स कार्लसेन यांच्यातील चेस वर्ल्डकपची फायनल ही आज (दि. 22 ऑगस्ट) रोजी होणर आहे.
बुद्धीबळ विश्वचषकाचा सामना कोठे होणार आहे?
प्रग्नानंद आणि कार्लसेन यांच्यातील सामना हा अझरबैजान येथील बाकू येथे होणार आहे.
सामना कधी सुरू होणार?
प्रग्नानंद आणि कार्लसेन हे विजेतेपदासाठी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 ला एकमेकांना भिडणार आहेत.
हा हाय व्होल्टेज सामना टीव्हीवर कुठं लाईव्ह दिसणार?
बुद्धीबळ विश्वचषक अंतिम सामना हा कोणत्याही टीव्ही चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात येणार नाहीये.
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे का?
प्रग्नानंद विरूद्ध कार्लसेन यांच्यातील थरारक बुद्धीबळाचा सामना हा Fide Chess' YouTube आणि ट्विटवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.