Who is Sachin Dhas Selected For Asia Cup : जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू सचिन संजय धस याने आपल्या क्रिकेट खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले आहे. आगामी काळात दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. विशेष म्हणजे त्याच्या आई व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस या देखील कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू राहीलेल्या आहेत.
सचिन धस हा लहानपणीपासूनच क्रिकेटचे धडे गिरवतोय. त्याचे वडिल संजय धस आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तर, आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत. सचिनला प्रारंभापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्याच्या खेळाला कौशल्याची जोड मिळावी म्हणून त्याने शहरातीलच एका क्लबमध्ये क्रिकेटचे धडे गिरविले.
सर्वात प्रथम सचिन धस चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला. तेव्हापासून त्याच्या यशाचा आलेख चढताच होता. प्रारंभी विभागीय स्तरावर खेळल्यानंतर त्याची १४ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड झाली. त्या ठिकाणीही चमकदार कामगिरी केल्याने त्याची आता आशिया कपसाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघात स्थान निवड निश्चित झाली आहे.
त्याच्या अंगातील खेळाचे गुण पाहिलेल्या व स्वत: खेळाची आवड असलेल्या आई - वडिलांनी सचिन धसला सुरुवातीपासूनच खेळासाठी प्रोत्साहन दिले. सचिनचेही अभ्यासापेक्षा क्रिकेटलाच प्राधान्य असायचे. आता या निवडीतून त्याने पालकांचा विश्वास सार्थ ठरवला. त्याच्या निवडीने आता स्वप्नपूर्तीची पहिली पायरी गाठल्याची प्रतिक्रिया सचिनची आई सुरेखा व वडील संजय धस यांनी व्यक्त केली.
खेळांच्या सुविधांचा अभाव असलेल्या बीडसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारणारे अनेक खेळाडू या मातीने दिले आहेत. त्यातील एक हिरा म्हणजे सचिन धस.
यापूर्वी जिल्ह्यातीलच आष्टी तालुक्यातील रहिवाशी व सध्या भारतीय सैन्यदलात असलेल्या अविनाश साबळे यानेही जिल्ह्याचे नाव खेळाच्या माध्यमातून जगात नेले आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात दुबईत होणाऱ्या आशिया कपमध्ये सचिन धस खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.