Who Was Hamida Banu : जो मला हरवेल त्याच्याशीच मी लग्न करेन...; कोण आहे हमीदा बानो जिच्यासाठी गुगलने बनवले Doodle

Google Doodle Hamida Banu : आजकाल भारतात महिला कुस्तीपटूंचे वर्चस्व आहे. भारताला ऑलिम्पिकपासून जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत कुस्तीत पदके मिळाली आहेत.
Who Was Hamida Banu Google Doodle
Who Was Hamida Banu Google Doodle Newssakal
Updated on

Google Doodle Hamida Banu : आजकाल भारतात महिला कुस्तीपटूंचे वर्चस्व आहे. भारताला ऑलिम्पिकपासून जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत कुस्तीत पदके मिळाली आहेत. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल चॅम्पियन विनेश फोगट, आनंद पंघाल यांसारख्या मोठ्या नावांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे.

पण पूर्वी कुस्ती फक्त पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिला कुस्ती करतील याचा विचारही कोणी केला नव्हता. त्यावेळी यूपीची हमीदा बानो देशातील पहिली महिला कुस्तीपटू बनली. गुगलने 4 मे 2024 रोजी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांना समर्पित करत डूडल तयार केले आहे.

Who Was Hamida Banu Google Doodle
IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

हमीदा बानो 1940-50 च्या दशकातील देशातील सर्वात लोकप्रिय कुस्तीपटू होत्या. देशातील अनेक बड्या कुस्तीपटूंना पराभूत करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू होती. हमीदा बानोने कुस्तीच्या सामन्यात जो कोणी तिला पराभूत करेल त्याच्याशी लग्न करेल, अशी अट घातली होती.

Who Was Hamida Banu Google Doodle
MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

जेव्हा जेव्हा कुस्तीच्या मैदानात हमीदा बानो उतरायची तेव्हा तिला पाहून विरोधक घाबरायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची उंच 5 फूट 3 इंच आणि वजन 108 किलो होते. तिच्या रोजच्या आहारात पाच-सहा लिटर दूध, दोन-आठ लिटर सूप, एक-आठ लिटर फळांचा रस, एक किलो चिकन, एक किलो मटण, एक किलो बदाम, अर्धा किलो तूप, सहा अंडी आणि दोन प्लेट बिर्याणी यांचा समावेश होता.

भारतातील यशानंतर हमीदा बानोने युरोपात जाऊन लढायचे ठरवले. इथून त्याच्या करिअरचा ग्राफ खाली घसरू लागला. त्यानंतर बानो कुस्तीच्या दुनियेतून अचानक गायब झाली. हमीदा बानोने 2006 मध्ये लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.