World Cup 2023 KL Rahul or Ishan Kishan : वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यासाठी फक्त एक महिना राहिला आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 15 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल इशान किशन या दिग्गज खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. यादरम्यान आगरकरने सांगितले की, इशान किशन किंवा केएल राहुलमध्ये कोणाला संधी मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून संघात फिटनेसची मोठी समस्या होती. श्रेयस अय्यर, केएल, जसप्रीत बुमराह जखमी झाले आहेत. आम्ही या संघात समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. केएल राहुल आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.
दरम्यान, एका पत्रकाराने त्यांना विचारले की कोणाला संधी दिली जाईल, इशान किशन की केएल राहुल. याला उत्तर देताना आगरकर म्हणाले, “आम्ही याबाबत अजून विचार केलेला नाही. इशान खेळू शकतो. पण हे आम्ही नंतर ठरवू. जे आमच्या संघासाठी चांगले असेल. आम्ही त्यांना संधी देऊ.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.