Asian Games 2023 : 3189 पदकं जिंकून कोणत्या देशानं एशियन गेम्समध्ये निर्माण केलाय आपला दबदबा?

Hangzhou Asian Games 2023
Hangzhou Asian Games 2023 ESAKAL
Updated on

Hangzhou Asian Games 2023 : चीनमधील हांगझहोऊ येथे एशियन गेम्स 2023 ची अधिकृत सुरूवात 23 सप्टेंबरला होणार आहे. एशियन गेम्स 2023 अनेक स्तरावर विक्रमी ठरणार आहे. यात अनेक खेळाडू रेकॉर्ड ब्रेक करतील तसेच पदकांचे वैशिष्ठपूर्ण डिझाईन, ऑलिम्पिकमधील स्थान पक्क करणं यांचा समावेश आहे.

रेकॉर्ड ब्रेक 11,970 खेळाडू घेणार सहभाग

45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (NOC) एकूण मिळून 11970 खेळाडू यंदाच्या हांगझहोऊ एशियन गेम्स 2023 मध्ये सहभागी होणार आहेत. एशियन गेम्समधील आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सहभागी खेळाडूंची संख्या आहे. या खेळाडूंच्या प्रचंड संख्येमुळे एशियन गेम्समधील स्पर्धा या चुसरशीच्या होतील यात काही शंका नाही.

Hangzhou Asian Games 2023
IND vs AUS : एक भारतीयच ठरणार भारताची डोकेदुखी; 21 वर्षाचा युवा गोलंदाज भल्या भल्यांची भंबेरी उडवणार?

पदकांचे डिझाईन हे लिआंगझहू संस्कृतीवरून प्रेरित

यंदाच्या एशियन गेम्समध्ये मिळणारी पदके ही फक्त एका धातूचा तुकडा नसणार तर त्यात कलात्मकता देखील असणार आहे. लिआंगझहू निओलेथिक (नवपाषाण युग) संस्कृतीवरून प्रेरणा घेऊन तयार केलेली पदके खेळाडूंना मिळणार आहेत. ही निओलेथिक संस्कृती हांगझहोऊमध्ये जवळापस 5300 वर्षापूर्वी अस्तित्वात होती. पदकांचे डिझाईन हे या भागात सापडलेल्या पुरातन आध्यात्मिक वस्तूंवरून घेण्यात आले आहे.

पदकांच्या शर्यतीत चीनच अव्वल

एशियन क्रीडा जगतात चीनने आपला दबदबा कामय ठेवला आहे. चीनने पदार्पणाच्या 1974 च्या एशियन गेम्सपासून आतापर्यंत तब्बल 3189 पदके जिंकली आहेत. एशियन गेम्सच्या पदक तालिकेत सर्वाधिक पदके जिंकणाऱ्यांच्या यादीत चीन आपले आपले अढळ असे अव्वल स्थान निर्माण केलं आहे. चीननंतर सर्वाधिक पदके जिंकणाऱ्यांच्या यादीत जपान, दक्षिण कोरिया, इराण आणि भारताचा नंबर लागतो.

उत्तर कोरिया देखील 185 खेळाडूंसह होणार सहभागी

यंदाच्या एशियन गेम्समध्ये दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे स्वतंत्ररित्या मैदानात उतरतील. उत्तर कोरिया आपल्या 185 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. त्यानी यापूर्वी जकार्ता येथील 2018 मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी 12 सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

आर्चरीमध्ये उत्तर कोरियाचा दबदबा

आर्चरीच्या जगतात रिपब्लिक ऑफ कोरिया (उत्तर कोरिया) यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. ते आर्चरीमधील एक पॉवर हाऊस आहेत. त्यांनी 1978 पासून आतापर्यंतच्या एशियन गेम्समध्ये तब्बल 42 सुवर्ण पदके पटकावली आहेत.

Hangzhou Asian Games 2023
World Cup 2023 : 'या' दोन खेळाडूंमुळे संजूचा वर्ल्डकपमधून पत्ता कट, हरभजन सिंगच्या वक्तव्याने उडाली खळबळ

जपानचा धडाका सुरूच

जपानने एशियन गेम्समध्ये आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. जपानने एशियन गेम्सच्या प्रत्येक स्पर्धेत 20 पेक्षा जास्त सुवर्ण पदक जिंकली आहेत. यावरून त्यांची क्रीडा जगतातील उच्च दर्जाचे सातत्य आणि निपुणता दिसून येते.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 पात्रता

हांगझहोऊ हे फक्त एशियन गेम्सचे व्यासपीठ नाही तर या स्पर्धेद्वारे अनेक खेळाडू आपला पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा कोटा देखील मिळवतील. यामध्ये अर्चरी, आर्टिस्टिक स्विमिंग, बॉक्सिंग, ब्रेकिंग, हॉकी, मॉडर्न पेन्टाथ्लॉन, सेलिंग, टेनिस, वॉटर पोलो या नऊ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.