IPL 2023 Auction : आयपीएल 2023 मिनी लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंनी मोठा धमाका केला. सहसा आयपीएलला नाके मुरडणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंसाठी भारतीय फ्रेंचायजींनी आपल्या पर्समधील मोठी रक्कम खर्च केली. पंजाब किंग्जने सॅम करनला 18.5 कोटी रूपयाला खेरदी केले. सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला. याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससाठी 16.25 कोटी तर सनराईजर्स हैदराबादने हॅरी ब्रुकसाठी 13.25 कोटींची बोली लावली.
इंग्लिश खेळाडू हंगाम अर्ध्यावर सोडून जातात. ऐनवेळी माघार घेतात, कसोटीला प्राधान्य म्हणत फ्रेंचायजींचे टेन्शन वाढवतात हा इतिहास आहे. असे असतानाही यंदाच्या लिलावात इंग्लिश खेळाडूच का केंद्रस्थानी राहिले याची उत्सुकता सर्वांनाच होती.
याबाबत दोन प्रमुख कारणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्लंड हा ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकप विजेता संघ आहे. त्यांच्याकडे टी 20 स्पेशलिस्ट म्हणवतील असे बरेच खेळाडू आहेत. दुसरे कारण म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायजींना एक पत्र पाठवले होते.
त्यात त्यांनी खुलासा केला होता ही या हंगामात जून महिन्यात अॅशेस मालिका होत असली तरी इंग्लंडचे सर्व खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगाम खेळणार आहेत. त्यामुळे फ्रेंचायजींनी यंदा इंग्लंडच्या खेळाडूंवर मुक्तहस्ते उधळण केली. जर ही गोष्ट स्पष्ट झाली नसती तर फ्रेंचायजींनी सॅम करन आणि बेन स्टोक्सला इतकी मोठी बोली लावली नसती.
तसेच ज्या प्रकारे इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेट खेळतोय त्यावरून इंग्लंड क्रिकेटचा पारंपरिक दृष्टीकोण बदलला असल्याचे जाणवते. याचा फायदा आयपीएलमध्ये फ्रेंचायजींना देखील होईल असा अंदाज क्रिकेट पंडितांनी वर्तवला आहे.
ऑक्शनमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे इंग्लिश खेळाडू
सॅम करन (18.50 कोटी) - पंजाब किंग्ज
बेन स्टोक्स (16.25 कोटी ) - चेन्नई सुपर किंग्ज
हॅरी ब्रूक (13.25 कोटी) - सनराईजर्स हैदराबाद
विल जॅक्स (3.20 कोटी) - रॉयल चॅलेंजर बेंगलोर
आदिल राशिद (2 कोटी) - सनराईजर्स हैदराबाद
फिल सॉल्ट (2 कोटी) - दिल्ली कॅपिटल्स
रीस टॉप्ली (1.90 कोटी) - रॉयल चॅलेंजर बेंगलोर
जो रूट ( 1 कोटी ) - राजस्थान रॉयल्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.