Ind vs Eng : BCCI ने आवेश खानला टीम इंडियातून अचानक का काढले बाहेर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Why Avesh Khan Has Been Released by BCCI From India's Test Squad For England Series cricket news in marathi
Why Avesh Khan Has Been Released by BCCI From India's Test Squad For England Series cricket news in marathi sakal
Updated on

India's Test Squad For England Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आवेश खानलाही संधी दिली होती. आवेशचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हैदराबाद कसोटीपूर्वी त्याला सोडले आहे. वृत्तानुसार, आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. तो रणजीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो.

Why Avesh Khan Has Been Released by BCCI From India's Test Squad For England Series cricket news in marathi
AUS vs WI : कोविड-19 पॉझिटिव्ह तरीही खेळाडू उतरला क्रिकेटच्या मैदानात, कशी मिळाली परवानगी? जाणून घ्या नियम

आवेश खान भारताकडून टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. आता त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळणार होती. मात्र त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला सोडले आहे. मात्र, तो लवकरच परत येऊ शकतो.

आवेशने भारतासाठी 8 वनडे सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. त्याने 20 टी-20 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. आवेशला भारताच्या 16 सदस्यीय संघात स्थान मिळाले. मात्र आता त्याला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे.

Why Avesh Khan Has Been Released by BCCI From India's Test Squad For England Series cricket news in marathi
IND vs ENG : इंग्लंड तो गयो... 3 फिरकीपटू अन् 2 धाकड गोलंदाज! जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मधील मध्य प्रदेशचा पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. संघाने तिसऱ्या सामन्यात दिल्लीचा 86 धावांनी पराभव केला.

याआधी विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो हैदराबाद कसोटीत खेळत नाहीये. कोहलीच्या जागी टीम इंडियाने रजत पाटीदारचा संघात समावेश केला आहे. मात्र, पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.