Ind vs Agf : केएल राहुलला अफगाणिस्तान टी-20 मालिकेत का मिळाली नाही संधी? मोठे कारण आले समोर

Why KL Rahul Not Selected Team India News |
Why KL Rahul Not Selected Team India Marathi News
Why KL Rahul Not Selected Team India Marathi News
Updated on

India vs Afghanistan T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी विराट कोहलीही परतला आहे.

रोहित-विराट टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापासून संघासाठी या फॉरमॅटचा भाग नाहीत. तब्बल 14 महिन्यांनंतर तो भारतीय टी-20 संघात परतला आहे. पण एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो निर्णय केएल राहुलची निवड न करण्याचा होता.

Why KL Rahul Not Selected Team India Marathi News
Shakib Al Hasan Video : राडा तर होणारच...! निवडणूक जिंकल्यानंतर कर्णधारने चाहत्याच्या मारली कानाखाली

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्यांच्या जागी जितेश शर्मा आणि संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता प्रश्न असा आहे की संजू-जितेशपेक्षा राहुल अधिक अनुभवी असूनही त्याला संघाबाहेर का ठेवण्यात आले?

Why KL Rahul Not Selected Team India Marathi News
Ind vs Afg T20 : इशान किशनचं टी-20 वर्ल्डकपचं स्वप्न भंगणार, द्रविडने लाडक्या खेळाडूसाठी दिला बळी?

या संघात युवा शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहलीही परतले आहेत. अशा स्थितीत राहुलला वरच्या फळीत स्थान मिळवणे फार कठीण आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, राहुलला या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले कारण निवडकर्त्यांनी सलामी आणि मधल्या फळीसाठी इतर पर्याय निवडले होते. राहुलने त्याचे बहुतेक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने सलामीवीर म्हणून खेळले आहेत, परंतु शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल संघात सामील झाल्यानंतर त्याच्यासाठी सलामीच्या स्थानावर स्थान मिळवणे कठीण आहे.

Why KL Rahul Not Selected Team India Marathi News
Heinrich Klaasen News : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! वर्ल्ड कपमध्ये घाम फोडणाऱ्या यष्टीरक्षकाने कसोटी क्रिकेटला अलविदा

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत केएल राहुलला संधी मिळाली नसली तरी तो टी-20 वर्ल्ड कप संघात आपले स्थान निश्चित करू शकतो. आगामी आयपीएल हंगामात त्याने यष्टिरक्षक फलंदाजी म्हणून चांगली कामगिरी केली तर त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकते. मात्र, इशान किशन, जितेश शर्मा, संजू सॅमसन यांच्या कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असेल.

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.