Prasidh Krishna : अष्टपैलू खेळाडूच्या जागी वेगवान गोलंदाजाला का दिली संधी; टीम रोहितचं वेगळंच प्लॅनिंग?

why prasidh krishna named in team india squad for world cup 2023 as the replacement of hardik pandya
why prasidh krishna named in team india squad for world cup 2023 as the replacement of hardik pandya
Updated on

Why Prasidh Krishna Named in Team India Squad : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कप-2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पण आता असा प्रश्न पडतो की, अष्टपैलू खेळाडू पांड्याची जागी वेगवान गोलंदाज का निवड केली असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा नक्की काय प्लॅनिंग आहे, हे जाणून घेऊया.

why prasidh krishna named in team india squad for world cup 2023 as the replacement of hardik pandya
Hardik Pandya : "मी टीम सोबतच! प्रत्येक बॉलला..." वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर पांड्याची भावनिक प्रतिक्रिया!

हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला आणण्यात काही अर्थ नाही. पण जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी कोणीही खेळाडू जखमी झाला तर प्रसिद्ध कृष्णाला संघात घेण्याचा विचार संघ व्यवस्थापनाने केला आहे. पण दुखापत किंवा इतर कोणतीही समस्या नसल्यास वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला एकही सामना खेळायला मिळणार नाही.

why prasidh krishna named in team india squad for world cup 2023 as the replacement of hardik pandya
Hardik Pandya : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का! उपकर्णधार स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

सध्या संघात फक्त चार वेगवान गोलंदाज आहेत. त्यापैकी चौथा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आहे, पण गोलंदाजी करताना त्याच्याकडे जास्त वेग नाही. त्यामुळे कोणात्या खेळाडूला दुखापतीत झाली तर प्रसिद्ध कृष्णा हा उत्तम पर्याय आहे. त्याची उंचीही चांगली आहे त्यामुळे त्याच्याकडे जोरदार उसळी आहे. जी भारतीय खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरू शकते. सध्या संघात यासारखा दुसरा गोलंदाज नाही.

टीम इंडियाला अजूनही दोन साखळी सामने खेळायचे आहेत, एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दुसरा नेदरलँडविरुद्ध. यानंतर संघ उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माला या तिन्ही सामन्यांमध्ये कोणताही बदल करायचा नाही, कारण 6 फलंदाज, एक अष्टपैलू आणि चार गोलंदाज असे संघाचे कॉम्बिनेशन चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.