Umran Malik : पहिल्या सामन्यात 2 विकेट घेणाऱ्या कुलदीपऐवजी उमरान का आला संघात?

Umran Malik Replaced Kuldeep Sen
Umran Malik Replaced Kuldeep Senesakal
Updated on

Umran Malik Replaced Kuldeep Sen : भारतासाठी बांगलादेशविरूद्धचा दुसरा वनडे सामना म्हणजे करो या मरो स्थिती आहे. आजचा सामना जर भारताने गमावला तर भारतावर बांगलादेशविरूद्ध मालिका गमावण्याची नामुष्की ओढवू शकते. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमी धावसंख्येतही बांगलादेशच्या फलंदाजीला भगदाड पाडले होते. वेगवान कुलदीप सेनने 2 विकेट्स घेतल्या होत्या. तरी देखील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने त्याच्या ऐवजी उमरान मलिकला संधी दिली. कुलदीपला पहिल्या सामन्यात विकेट काढून देखील दुसऱ्या सामन्यात का घेण्यात आले नाही हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

Umran Malik Replaced Kuldeep Sen
BAN vs IND 2nd ODI : 4, 4, 6, 1... जखमी वाघ रोहित शेवटपर्यंत लढला मात्र भारत हरला

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीस आला त्यावेळी त्याने आजच्या सामन्यात दोन बदल असल्याचे सांगितले. शाहबाज अहमदच्या ऐवजी अक्षर पटेल संघात आला अजून कुलदीप सेनच्या जागी उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे. कुलदीप सेनला एकाच सामन्यात संधी देऊन वगळण्याबाबत रोहित म्हणाला की, कुलदीप सेन हा आजच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. कुलदीप का उपलब्ध नव्हता याबाबत रोहितने अधिक स्पष्टीकरण दिले नाही. अखेर बीसीसीआयने प्लेईंग 11 संघ जाहीर करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये कुलदीपला पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

Umran Malik Replaced Kuldeep Sen
IND vs BAN : BCCI घेणार कठोर निर्णय! बांगलादेशविरुद्ध मालिका गमावली तर रोहितचे कर्णधारपद...

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर - उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमारन मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.