T20 World Cup 2021: युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी काल भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टी२० संघात रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या दोन फिरकीपटूंना संधी देण्यात आली. पण आश्चर्याची बाब म्हणजे, अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात स्थान देण्यात आले नाही. चहलची गेल्या तीन-चार वर्षातील टी२० आणि वन डेमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. असे असूनही त्याला संधी का नाकारण्यात आली? याबद्दल निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (BCCI Chief Selector Chetan Sharma) यांनी स्पष्टीकरण दिले.
यंदाच्या वर्षी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडे असला तरी देशातील कोरोना परिस्थिती पाहता ही स्पर्धा युएईमध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा विचार करत असताना युजवेंद्र चहलचा संघात समावेश का केला गेला नाही, असा सवाल विविध स्तरातून करण्यात येत होता. त्यावर चेतन शर्मा यांनी आपली बाजू मांडली. "आम्ही युजवेंद्र चहलपेक्षाही राहुल चहरला पसंती देण्यामागचे मूळ कारण म्हणजे एका विशिष्ट प्रकारची फिरकी गोलंदाजी. आम्हाला बऱ्यापैकी वेगाने चेंडू वळवण्याची क्षमता राखणारा असा लेग स्पिनर हवा होता. त्यामुळे आम्ही युवा गोलंदाज राहुल चहर आणि वरूण चक्रवर्ती यांना संघात स्थान दिले. वरूण हा रहस्यमय गोलंदाजी करण्यात निष्णात आहे. त्याच्या हातावरून किंवा मनगटावरून तो टाकत असलेला चेंडू स्पिन होईल की गुगली असेल हे पटकन कळत नाही. या कारणास्तव या दोघांना चहलपेक्षाही जास्त पसंती देण्यात आली", असे चेतन शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.