Wi vs Ind 1st Test : भयंकर उकाड्यात रोहित-यशस्वीचा धडाका अन् कॅरेबियन गोलंदाज मैदान सोडून गेला पळून

Wi vs Ind 1st Test
Wi vs Ind 1st Test sakal
Updated on

Wi vs Ind 1st Test : भारतीय क्रिकेट संघ डॉमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी क्रीजवर आक्रमक फटकेबाजी केली. दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. डॉमिनिकामध्ये खूप गरमी आहे आणि त्यामुळे रोहित-यशस्वीही त्रस्त झाले.

Wi vs Ind 1st Test
WI vs IND Schedule : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात होणार बदल? मोठे कारण आले समोर

रहकीम कॉर्नवॉलने सोडले मैदान

वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवॉल हा क्रिकेट इतिहासातील सर्वात वजनदार खेळाडू आहे. डॉमिनिकाची उष्णता तो सहन करू शकत नाही. कॉर्नवॉल हा फिरकी गोलंदाज आहे आणि त्याचा रनअपही खूपच कमी आहे.

यानंतरही गोलंदाजी करताना त्याला श्वास घेण्यास त्रास झाला. वैद्यकीय पथकाने येऊन त्याची तपासणी केली. काही औषधही दिले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. राहकीम कॉर्नवॉल केवळ 11 षटके टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला. त्याला इन्फेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Wi vs Ind 1st Test
VIDEO: शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वालला राग आला, मैदानातच वेस्ट इंडिजच्या खेळाडूला केली शिवीगाळ

राहकीम कॉर्नवॉल या सामन्यात वेस्ट इंडिजचा मुख्य फिरकी गोलंदाज होता. यशस्वी जैस्वालला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या ऑफस्पिनरविरुद्ध खेळणे कठीण जात होते. त्याच्या 11 षटकांत भारतीय फलंदाजांनी केवळ 22 धावा करता आल्या. पण तो बाहेर गेल्याबरोबर भारतीय संघाची सर्वात मोठी अडचण गेली. त्यानंतर पार्ट टाइम स्पिनरने वेस्ट इंडिजसाठी गोलंदाजी सुरू केली. पण ते भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकले नाहीत.

भारताचे फलंदाजही ऊन आणि उकाड्याने हैराण झाले होते. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बेंचवर बसलेले भारतीय खेळाडू रोहित आणि यशस्वीसाठी छत्री घेऊन जात होते. रोहित शर्मा अनेकदा टी-शर्टमध्ये थंड पाणी ओतताना दिसला. पण भारतीय खेळाडू चांगल्या फिटनेसमुळे टिकून राहिले. तर कॉर्नवॉलला मैदानाबाहेर जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.