WI vs IND: सॅमसनची संघात निवड होताच गदारोळ, भारतीय मॅनेजमेंट कडून 'या' खेळाडूवर अन्याय?

sanju samson wi vs ind 2nd odi
sanju samson wi vs ind 2nd odi
Updated on

Wi vs Ind 2nd ODI : सलग तीन सामन्यांत असहाय दिसणाऱ्या वेस्ट इंडिजने अखेर भारताविरुद्ध पहिले यश मिळवले. बार्बाडोस येथे यजमान वेस्ट इंडिजने वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सनी पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय युवा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध लढला. या संघात संजू सॅमसनचेही नाव होते. मात्र सॅमसन पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.

sanju samson wi vs ind 2nd odi
IND vs WI: 'मी ससा नसून कासव...' विंडीजविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार पांड्या संतापला!

संजू सॅमसन हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात स्टायलिश फलंदाजांमध्ये गणला जातो. तो मोकळेपणाने फलंदाजी करतो तेव्हा यापेक्षा चांगला खेळ कोणीच करू शकत नाही असे वाटते. संजू सॅमसनला भारतीय संघात मर्यादित संधी मिळतात कारण विकेटकीपिंगसाठी 4-5 दावेदार आहेत. जेव्हा एखाद्या खेळाडूला मर्यादित संधी मिळतात, तेव्हा त्याला आपली छाप सोडावी लागते आणि संघात त्याचे स्थान निश्चित करावे लागते. पण संजू हे करू शकत नाही.

sanju samson wi vs ind 2nd odi
WI vs IND : रोहित-विराट दुसऱ्या वनडेतून का होते बाहेर? कोच राहुल द्रविडचा मोठा खुलासा!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी संजू सॅमसनचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. खेळपट्टी अवघड होती आणि संजूला मोठी खेळी करून स्वत:ला सिद्ध करण्याची उत्तम संधी होती. येथील मोठ्या खेळीकडे निवड समितीचे तसेच संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले असते. पण संजूला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो 19 चेंडूत केवळ 9 धावा करून बाद झाला.

sanju samson wi vs ind 2nd odi
WI vs IND : वर्ल्ड कपपूर्वी धोक्याची घंटा, एक नव्हे 5 गोष्टींनी वाढले द्रविड अन् रोहितचा टेन्शन

क्रिकेट चाहते बऱ्याच दिवसांपासून सॅमसनच्या संघात खेळण्याची वाट पाहत होते. जेव्हा-जेव्हा सॅमसनला संघात संधी मिळाली नाही, तेव्हा क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर गोंधळ अन् राडा सुरू केला. पण आता हे क्रिकेट चाहते सॅमसनला प्रचंड ट्रोल करत आहेत. दुसऱ्या वनडेत केवळ 9 धावा करून सॅमसन बाद झाला. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

sanju samson wi vs ind 2nd odi
WI vs IND 2nd ODI : अखेर विंडीजने 10 पराभवाचे दुष्टचक्र संपवले; भारताला 6 विकेट्सने लोळवले

ऋतुराजची झाली आठवण

सॅमसनच्या खराब कामगिरीवर चाहते खूपच नाराज दिसले. त्याचवेळी सॅमसनऐवजी ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश करता आला असता, असा विश्वासही अनेक चाहत्यांनी व्यक्त केला. गायकवाडला अद्याप या मालिकेत प्लेइंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.