Wi vs Ind 2nd ODI : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून नक्कीच जिंकला, पण या विजयानंतरही क्रिकेट चाहत्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम फलंदाजी का निवडली नाही? रोहित शर्मा सलामीला का आला नाही? विराट कोहलीने फलंदाजी का केली नाही? सीनियर्सला फलंदाजीच करायची नसती तर दौऱ्यावर जाऊन काय फायदा? सूर्यकुमार यादवचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे, ज्या पद्धतीने तो टी-20 क्रिकेट मध्ये खेळतो तसे वनडेत का खेळत नाही.
डिव्हिलियर्सनंतर मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणार्या सूर्यकुमार यादवला 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या टी-20 फॉर्मची पुनरावृत्ती करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. गुरुवारी त्याला सुवर्ण संधी मिळाली होती आणि तो चांगलाच खेळताना दिसत होता, परंतु गुडाकेश मोतीच्या चेंडूवर स्वीप शॉटने त्याचा डाव संपुष्टात आला. सूर्यकुमारला माहित आहे की श्रेयस अय्यर तंदुरुस्त असल्यास आणि केएल राहुल पुनरागमन केल्यास प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते, त्यामुळे त्याला 15 सदस्यांच्या संघात स्थान मिळणे कठीण होईल.
जेव्हा आपण सूर्यकुमारची एकदिवसीय कामगिरी पाहतो तेव्हा तो अपेक्षेप्रमाणे उभा राहिला नसल्याचे स्पष्ट होते. एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेल्या 22 डावांपैकी त्याला दोन अर्धशतके झळकावण्यात यश आले. दुर्दैवाने त्याच्या शेवटच्या 16 डावांमध्ये, सूर्यकुमार यादव एकही अर्धशतक झळकावण्यात आले नाही. त्याने केवळ सात वेळा दुहेरी आकडा ओलांडला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला सलग तीन गोल्डन डकचा सामना करावा लागला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय मधल्या फळीला थोडा त्रास झाला, पण लक्ष्य फक्त 115 धावांचे होते, त्यामुळे संघाने ते आरामात गाठले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतरही इशान किशनला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल.
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर तर सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. शेवटच्या वनडेत कोहलीची फलंदाजी आली नाही. संघाने चार किंवा त्याहून अधिक विकेट गमावण्याची ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ होती, तरीही त्याच्या फलंदाजीला काही आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.