Wi vs Ind 2nd T20 : 'तुम्ही आता जबाबदारी घ्या...' सलग 2 पराभवानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर

wi vs ind 2nd t20 hardik pandya
wi vs ind 2nd t20 hardik pandya
Updated on

West Indies vs India : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जॉर्जटाऊन गयाना येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दोन गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या संघाने तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 152 धावा केल्या.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 7 चेंडू राखून लक्ष्य गाठले. निकोलस पूरनने 40 चेंडूत 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. युझवेंद्र चहलने 16 व्या षटकात दोन विकेट घेत भारताला सामन्यात परत आणण्याचा नक्कीच प्रयत्न केला परंतु अल्झारी जोसेफ आणि अकील हुसैन यांनी 26 धावांची अखंड भागीदारी करून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या.

wi vs ind 2nd t20 hardik pandya
Asian Champions Trophy : भारताने मलेशियाचा उडवला 5-0ने धुव्वा! पॉईंट टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानावर

टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या चांगला संतापला होता. पराभवासाठी त्याने फलंदाजांना जबाबदार धरले. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर फलंदाजांची कामगिरी चांगली नव्हती, आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो." 160+ किंवा 170 चांगले एकूण झाले असते. सध्याच्या सांघिक संयोजनासह, आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी पहिल्या 7 फलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल आणि आशा आहे की गोलंदाज तुमचे सामने जिंकतील. फलंदाजांना अधिक जबाबदारी घेण्याची गरज आहे.

भारतासाठी या मालिकेत पदार्पण करणारा तिलक वर्मा जबरदस्त खेळत आहे. काल सातत्याने विकेट पडल्यानंतर तिलकने अर्धशतकी खेळी खेळली. कर्णधार हार्दिक पांड्याने त्याचे कौतुक केले, तो म्हणाला की, चौथ्या क्रमांकावर आल्याने आपल्याला विविधता मिळते. हा त्याचा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता असे वाटले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.