Jadeja-Ashwin : अश्विन-जडेजा या जोडीने रचला इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये केला 'हा' मोठा विक्रम

Jadeja And Ashwin
Jadeja And Ashwin
Updated on

Jadeja And Ashwin Bowling Pair Complete 500 Test Wicket : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने इतिहास रचला आहे. त्याने 500 ​​बळी पूर्ण केले आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. याआधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने हा पराक्रम केला होता.

Jadeja And Ashwin
Wi vs Ind Test: रोहित शर्माचा निर्णय नव्हता तर... कोणाच्या सल्ल्याने इशान नंबर-4 वर फलंदाजीला आला?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या डावात आर अश्विनने चौथ्या दिवसअखेर 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचा संघ 365 धावांचा पाठलाग करत आहे. अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांच्या विकेट घेत रवींद्र जडेजासोबत 500 विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान अश्विनने 274 आणि रवींद्र जडेजाने 226 विकेट घेतल्या.

त्याचबरोबर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने एकत्र खेळताना 501 कसोटी बळी घेतले. यामध्ये अनिल कुंबळेने 281 आणि हरभजन सिंगने 220 विकेट घेतल्या. कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने 54 व्या कसोटीत 501 बळींचा आकडा गाठला, तर अश्विन आणि जडेजा या जोडीने 49 व्या कसोटीतच 500 बळींचा आकडा गाठला.

Jadeja And Ashwin
VIDEO : ऋषभ पंतची बॅट... तशाच एका हाताने 'तो' षटकार, कर्णधाराच्या खरडपट्टीनंतर इशानचा रुद्रावतार

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय जोडी

  1. अनिल कुंबळे (281) आणि हरभजन सिंग (220)- 54 कसोटीत 501 बळी.

  2. आर अश्विन (274) आणि रवींद्र जडेजा (226) – 49 कसोटीत 500 बळी.

  3. बिशन बेदी (184) आणि बीएस चंद्रशेखर (184)- 42 कसोटीत 368 विकेट्स.

Jadeja And Ashwin
Ishan Kishan : इशान किशनचा मोठा पराक्रम, MS धोनीला जे जमलं नाही, ते दुसऱ्याच कसोटीत करून दाखवलं

अश्विन आणि जडेजाची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द

अश्विनने आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 176 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 23.61 च्या सरासरीने 486 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले. फलंदाजीत त्याने 131 डावात 26.97 च्या सरासरीने 3129 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

तर जडेजाने आतापर्यंत 66 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 126 डावांमध्ये गोलंदाजी करताना जडेजाने 24.07 च्या सरासरीने 273 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने बॅटमध्ये 36.09 च्या सरासरीने 2743 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()