WI vs IND: मालिका जिंकण्यासाठी पांड्या ॲक्शन मोडमध्ये! 'या' खेळाडूचा पत्ता कट?

WI vs IND 4th t20 Hardik Pandya
WI vs IND 4th t20 Hardik Pandya
Updated on

WI vs IND 4th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना शनिवारी रात्री 8:00 वाजता यूएसए मध्ये खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला पुढील दोन्ही सामने जिंकून मालिका काबीज करायची आहे. चौथ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून स्टार क्रिकेटरला वगळले जाऊ शकते.

WI vs IND 4th t20 Hardik Pandya
Disney+ Hotstar loses : डिस्ने+ हॉटस्टारला आयपीएलमुळे बसला मोठा धक्का! 1.2 कोटी सबस्क्राईबर गायब अन्...

भारताला ही टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकायची असेल, तर बाकीचे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. आपल्या चुकांमुळे टीम इंडिया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यावर झालेल्या तिन्ही कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत शुभमन गिलची बॅट शांत राहिली होती.

WI vs IND 4th t20 Hardik Pandya
Baba Aparajith : धोनीकडून काही शिकला नाही! बाद झाल्यावर आधी अंपायरशी नंतर खेळाडूंशी भिडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये शुभमन गिलने 5.33 च्या सरासरीने फक्त 16 धावा केल्या आहेत. शुभमन गिल पहिल्या 3 सामन्यात केवळ 3, 7 आणि 6 धावा करू शकला आहे. शुभमन गिलला चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी कर्णधार हार्दिक पांड्या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो.

WI vs IND 4th t20 Hardik Pandya
Prithvi Shaw Reaction : काऊंटी क्रिकेटमध्ये द्विशतक, टीम इंडियातील पुनरागमन... पृथ्वी शॉ म्हणतोय तरी काय?

यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन वेगवान फलंदाजीत माहिर आहे. इशान किशन क्रीझवर येताच अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे चित्र बदलतो. इशान किशनने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो आणि यशस्वी जैस्वाल हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र ओपनिंग करताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.