Mohammed Siraj : वेस्ट इंडिजमधून मोहम्मद सिराज अचानक घरी का पाठवलं? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं

Mohammed Siraj has been released Team India’s
Mohammed Siraj has been released Team India’s
Updated on

Mohammed Siraj : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. तो भारतात आला आहे. त्याची आधी वनडे मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र आता त्याला या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर असल्याची बातमी चिंतेची बाब नाही. त्यांना विश्रांती देण्याच्या उद्देशाने संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. (Mohammed Siraj has been released Team India’s ODI squad ahead of the three-match series against the West Indies)

Mohammed Siraj has been released Team India’s
Wi vs Ind ODI : बुमराह नाही जाणार आयर्लंडला? रोहित शर्माने दिले तंदुरुस्तीबाबत मोठी अपडेट

मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. कसोटी मालिकेतील तो भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. कॅरेबियन संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 2 विकेट घेतल्या होत्या तर पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले, जो त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामनावीर पुरस्कार होता.

वनडे मालिकेतून विश्रांती दिल्यानंतर सिराज आता थेट भारतात परतणार असल्याचे वृत्त आहे. तो अश्विन, अजिंक्य रहाणे, नवदीप सैनी आणि केएस भरत यांच्या नावांसह त्याच्या उर्वरित कसोटी सहकाऱ्यांसह भारतात परतणार आहे.

Mohammed Siraj has been released Team India’s
IND vs WI: कोणाचा पत्ता कट अन् वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत कोणाला मिळणार संधी ? जाणून घ्या Playing11

मोहम्मद सिराजचे नाव भारताच्या एकदिवसीय संघातही होते. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्येही तो वेस्ट इंडिजमध्ये भारतीय वेगवान आक्रमणासमोर आघाडीवर दिसणार होता. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने अचानक त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सिराजला अचानक का दिला आराम?

भारताची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपासून सुरू होत आहे. सिराज टीमचा महत्त्वाचा भाग आहे, पण विश्रांतीच्या नावाखाली त्याला संघातून वगळण्यात आले. आता विश्रांती घ्यायचीच असेल, तर वेस्ट इंडिजची एकदिवसीय मालिका आणि आशिया चषक यांच्यातील अंतर असतानाही हे काम करता आले असते. भारत एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत असताना अशा मालिकेत विश्रांती का देण्यात आली?

एकदिवसीय सामन्यातील सिराजचे हे आकडे

सिराजने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 24 सामन्यांत 20.72 च्या सरासरीने 43 बळी घेतले आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक विकेट म्हणजे 29 विकेट फक्त त्यांच्या भारतीय खेळपट्ट्यांवर आहेत, जिथे विश्वचषक खेळला जाणार आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी सरासरी 15.44 पर्यंत कमी होते. यंदाच्या वनडे विश्वचषकात टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज किती महत्त्वाचे अस्त्र ठरू शकतो, हे आता यावरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.