Wi vs Ind Series Shubman Gill : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचे कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा सुपरस्टार शुभमन गिल या दोन्ही संघात आहे. पण आधी असे वारे वाहत होते की त्याला संघातील जबाबदारी वाढवत उपकर्णधारपद दिले जाऊ शकते. तसे काहीही झाले नाही. आता प्रश्न असा आहे की? टीम इंडियाला त्याच्यावर विश्वास नाही की आणखी काही.
शुभमन गिलवर विश्वास ठेवायचा की नाही हा मुद्दा आहे, त्याबद्दल बोलण्यापूर्वी सध्याच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार असेल. पण उपकर्णधाराची भूमिका विभागली आहे. या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. त्याचवेळी हार्दिक पांड्या वनडेमध्ये हे काम करताना दिसणार आहे.
टीम इंडियाचा शुभमन गिलवर विश्वास नाही असे अजिबात नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्लॅटफॉर्म मध्ये शुभमन गिलने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मग प्रश्न पडतो की इतकं असताना मग जबाबदारी का नाही? त्याला संघाचे उपकर्णधारपद का मिळाले नाही?
अशा प्रश्नांची उत्तरे टीम इंडियासमोरील पर्यायांमध्ये दडलेली आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात अजिंक्य रहाणे कसोटीत उपकर्णधारपदाचा पर्याय म्हणून उपस्थित होता. असाच एकदिवसीय संघात हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
रहाणे आणि पांड्याला आधीच टीम इंडियाचे उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण याशिवाय या दोघांनाही भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, जो शुभमन गिलकडे नाही. म्हणजे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत रहाणे आणि पंड्या संघाची कमान चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात.
शुभमन गिल हा भारतीय संघाचा भावी कर्णधार किंवा उपकर्णधार आहे यात शंका नाही. तो भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा स्टार आहे. त्याचे वय अजून कमी आहे आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला या सुपरस्टारला कोणत्याही प्रकारचा दबाव द्याचा नाही.
गिलला कर्णधार आणि उपकर्णधारपदासाठी भरपूर संधी मिळतील. पण सध्या त्याने फलंदाजी सुधारली पाहिजे जी त्याची ताकद आहे, तर टीम इंडियासाठी चांगले होईल. संघ व्यवस्थापनाच्या या इराद्याने त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील उपकर्णधार पदापासुन लांब ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.