Hardik Pandya Latest News: पांड्या फक्त बोलण्याच्या कामाचा? बॅटिंगपासून कर्णधारपदापर्यंतचा फॉर्म संपला, टीम इंडिया टेन्शनमध्ये

Hardik Pandya Latest News: पांड्या फक्त बोलण्याच्या कामाचा? बॅटिंगपासून कर्णधारपदापर्यंतचा फॉर्म संपला, टीम इंडिया टेन्शनमध्ये
Updated on

WI vs Ind Update: हार्दिक पांड्या सामना पूर्ण करू शकला नाही हे मान्य केले तर सर्व काही ठीक होईल का? कर्णधार या नात्याने कधी-कधी हरणे आवश्यक असते, त्यातून शिकायला मिळते असे म्हणायचे का?

आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या नावाखाली टीम इंडिया प्रयोगांवर प्रयोग करत आहे. पण, हार्दिक पांड्याचं काय? तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. मग त्यांचे गांभीर्य त्याच्या खेळात का दिसत नाही, जो फक्त त्याच्या बोलण्यापुरता मर्यादित राहिला आहे का?

खरं तर, वेस्ट इंडिज दौऱ्यात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि कर्णधारपदात अपयशी ठरला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या दौऱ्यात केवळ त्याचे शब्द ऐकायला मिळाले आहे. पांड्याला त्याच्या नावाप्रमाणे मैदानावर कामगिरी करता आली नाही. पांड्या संघाचा अष्टपैलू आणि मॅच विनर खेळाडू आहे. पण टी-20 मालिकेत जिंकलेले दोन सामने इतर खेळाडूंच्या कामगिरीवर जिंकले होते. मग जिंकण्यात पांड्याचा हात कुठे आहे?

Hardik Pandya Latest News: पांड्या फक्त बोलण्याच्या कामाचा? बॅटिंगपासून कर्णधारपदापर्यंतचा फॉर्म संपला, टीम इंडिया टेन्शनमध्ये
Venkatesh Prasad : 'तुमचा आवडता खेळाडू आहे म्हणून आंधळे...' प्रसादने पांड्याची काढली खरडपट्टी

पांड्या वेस्ट इंडिजमध्ये ODI, टी-20 मालिकेत अपयशी

आयपीएल 2023 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पांड्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर जे केले ते टीम इंडियाला टेन्शन देणार आहे. या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 7 डावांपैकी ODI आणि टी-20 सामन्यामध्ये 70 धावांची एक नाबाद खेळी सोडली, तर त्यानंतर एकदाही पांड्या 50 धावांच्या जवळपास खेळी करता आली नाही. यामध्ये टी-20 मालिकेत त्याने फक्त 4 डावात केवळ 77 धावा केल्या आहेत.

Hardik Pandya Latest News: पांड्या फक्त बोलण्याच्या कामाचा? बॅटिंगपासून कर्णधारपदापर्यंतचा फॉर्म संपला, टीम इंडिया टेन्शनमध्ये
WCPL Rule : टी-20 क्रिकेटमध्ये मैदानावरील टाइमपास बंद! वेळात खेळला नाही तर रेड कार्ड अन् खेळाडू...

टी-20 विश्वचषक 2022 पासून आतापर्यंत हार्दिक पांड्या किती बदलला आहे, याचा अंदाज तुम्हाला 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी त्याची कामगिरी पाहिल्यावर येईल.

हार्दिकने टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी 59 डावांमध्ये 3 फिफ्टी प्लस स्कोअरसह 1117 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 146 हून अधिक झाला आहे.

त्याच वेळी, विश्वचषक 2022 नंतर, हार्दिक पांड्या फ्लॉप दिसला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 डावांमध्ये 114.92 च्या स्ट्राइक रेटने केवळ 231 धावा करता आल्या. टी-20 विश्वचषक 2022 च्या आधी आणि नंतर पांड्याच्या स्ट्राईक रेटमधील मोठा फरक हे टीम इंडियाच्या चिंतेचे खरे कारण आहे.

Hardik Pandya Latest News: पांड्या फक्त बोलण्याच्या कामाचा? बॅटिंगपासून कर्णधारपदापर्यंतचा फॉर्म संपला, टीम इंडिया टेन्शनमध्ये
Venkatesh Prasad : 'तुमचा आवडता खेळाडू आहे म्हणून आंधळे...' प्रसादने पांड्याची काढली खरडपट्टी

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरलाही वाटतं की, तो हार्दिक पांड्या नाही जो आपण सर्वजण ओळखत होतो. पंड्याने कधीच षटकार मारण्यास मागेपुढे पाहिले नाही. पण, वेस्ट इंडिजमध्ये दिसणारा तो पांड्या नव्हता. आता प्रश्न असा आहे की, अशा कामगिरीच्या जोरावर आशिया कप आणि त्यानंतर वनडे विश्वचषकात पांड्याची ताकद कशी दिसेल?

टीम इंडियाची चिंता फक्त हार्दिक पांड्याची फलंदाजीच नाही तर त्याची कर्णधारपदाचीही आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका तर तो हारलाच आहे. मात्र, या मालिकेत कर्णधारपद भूषवताना तो ज्या प्रकारे गोंधळलेला दिसत होता, त्यावरून ही समस्या गंभीर असल्याचे दिसत आहे.

गोलंदाजीतील बदला बाबतच्या त्याच्या निर्णयवर प्रश्नचिन्ह आहेत. त्यांच्याकडे योजनाच नाही असे वाटत होते आणि, याविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला की, मी फारसे नियोजन करत नाही. त्या परिस्थितीत मला जे योग्य वाटते त्यानुसार मी निर्णय घेतो.

पांड्या सध्या भारताचा टी-20 कर्णधार आहे. आगामी काळात त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याचीही चर्चा आहे. पण, सध्याची कामगिरी पाहता त्याचा दावा सार्थ ठरेल, असे वाटत नाही. अशा स्थितीत पांड्याला त्याचा टोन सेट करण्याची गरज आहे. कारण फलंदाजीतील धमाका त्याच्या कर्णधारपदावरही आत्मविश्वास आणेल. पांड्याची बॅट चाली तर आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेचा मार्ग भारतासाठी किती सोपा होईल हे सर्वांनाच माहीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.