Team India Wi vs Ind : भारतीय संघ महिनाभराच्या विश्रांतीनंतर वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. टीम इंडियाची 2 कसोटी आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी घोषणा होताच चाहत्यांनी पुन्हा एकदा निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या चेतेश्वर पुजाराच्या समर्थनार्थ माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्राही मैदानात उतरला आहे.
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कांगारूंकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने एका ट्विटमध्ये भारतीय संघातील अव्वल खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे सर्व खेळाडूंवर टीका केली आहे. 2020 पासून आतापर्यंतच्या कसोटीतील कामगिरीबद्दल आकाशने आघाडीच्या खेळाडूला बरेच काही सांगितले आहे.
आकाश चोप्राने आपल्या ट्विटमध्ये सर्व खेळाडूंची कसोटी सरासरी दिली आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंची आकडेवारी ट्विट केली आहे. त्यातच टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था बिकट आहे.
पुजाराच्या हकालपट्टीमुळे त्याने विराट कोहलीच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आकाश चोप्राने म्हटले आहे की, जर पुजाराला त्याच्या कामगिरीमुळे वगळण्यात आले तर कोहलीची फलंदाजीची सरासरीही पुजाराच्या बरोबरीची आहे.
यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्राने म्हटले की पुजारा आता संघात नाही. प्रश्न एवढाच आहे की हा निर्णय योग्य आहे का? मी कोणतेही मत मांडत नाही, परंतु मागील तीन कसोटी क्रिकेटमधील काही भारतीय क्रिकेटपटूंची आकडेवारी मांडत आहे. रोहित शर्माने 18 सामन्यात 43 च्या सरासरीने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
गिलची 16 सामन्यांत सरासरी 32 आणि केएल राहुलची 11 सामन्यांत 30 सरासरी आहे. पुजाराची 28 सामन्यात 29.69 ची सरासरी आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 25 सामन्यात 29.69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेची सरासरी सर्वात वाईट म्हणजे 20 कसोटीत 26.50 आहे. तथापि, त्याने डब्ल्यूटीसीमध्ये चांगली कामगिरी केली.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, या आकडेवारीच्या आधारे निवडकर्त्यांनी पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पुजारा पुनरागमन करणार नाही, अशा गोष्टी आता बोलु नयेत. अजिंक्य रहाणेचेही असेच पुनरागमन केले आहे. याआधी संघातून वगळलेल्या पुजाराने स्वत: कौंटीमध्ये चांगली कामगिरी करून पुनरागमन सुनिश्चित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.